शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उपबाजारात आठवडे बाजार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:46 IST

शेतकरी, व्यापाºयांच्या व्यवसायाचा व सर्वसामान्यांना ताजा शेतीमाल स्वस्त भावांत मिळावा, असा विचार करून सिन्नरफाटा उपबाजार समितीच्या आवारात दर शनिवारी आठवडे बाजार भरविण्यास प्रारंभ केल्याचे बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांनी सांगितले.

नाशिकरोड : शेतकरी, व्यापाºयांच्या व्यवसायाचा व सर्वसामान्यांना ताजा शेतीमाल स्वस्त भावांत मिळावा, असा विचार करून सिन्नरफाटा उपबाजार समितीच्या आवारात दर शनिवारी आठवडे बाजार भरविण्यास प्रारंभ केल्याचे बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सिन्नर फाटा उपबाजार समितीच्या आवारात दर शनिवारी भरविण्यात येणाºया आठवडे बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी चुंबळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती संजय तुंगार, संचालक प्रवीण नागरे, रावसाहेब खांडबहाले, युवराज कोठुळे, संदीप पाटील, पप्पू खंदारे, चंद्रकांत निकम, विमलबाई जुंद्रे, समितीचे सचिव महेंद्र निकाळे, व्यापारी सुनील कांबळे, लक्ष्मण सोनवणे, गोरख गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच आठवडे बाजाराच्या दिवशी भाजीपाला, धान्य, विविध वस्तू आदिंची दुकाने शेतकरी, विक्रेत्यांनी थाटली होती. यावेळी चुंबळे यांनी उपबाजार समितीच्या कर्मचाºयांना आठवडे बाजार यशस्वीरीत्या सुरू होण्याबाबत विविध सूचना केल्या. यावेळी बाळू भोर, शिवाजी म्हस्के, ज्ञानेश्वर तुंगार, यशवंत पवार, बाजार समिती शाखा प्रमुख सोमनाथ पिंगळे, रवींद्र तुपे, लालदास तुंगार, बाळासाहेब पोवळे, अनिल हांडोरे, अशोक पाळदे, नंदू सोनवणे आदिंसह शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.सोयी-सुविधांची गरजसिन्नर फाटा उपबाजार आवार समितीच्या आवारात विविध समस्या, प्रश्न असून ते मार्गी लावण्याचे गरजेचे आहे. आठवडे बाजारासाठी जागा सपाटीकरण, वाहनतळासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रकाश योजना करणे, स्वच्छतागृह उभारणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे तेथील सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी केली आहे.