शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

आम्ही राहू ना राहू, तिरंगा फडकला पाहिजे!

By admin | Updated: September 26, 2016 00:53 IST

एसजी पब्लिक स्कूल : जिल्हास्तरीय स्पर्धेत बालकवींकडून शहिदांना श्रद्धांजली

सिन्नर : नजर ध्वजाकडे जाता सलाम केला पाहिजे... आम्ही राहू ना राहू, तिरंगा फडकला पाहिजे! शत्रूची गोळीही या पोलादी छातीवर घेऊ... प्राण आमचे या तिरंग्याला काळ्यामातीवर देऊ! या स्वरचित ओळींद्वारे निऱ्हाळे हायस्कूलच्या विद्यार्थ्याने उरी येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली. निमित्त होते येथील एसजी पब्लिक स्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धेचे.येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ व ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने एसजी पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर व ग्रामीण भागातील २८० विद्यार्थ्यांनी सामाजिक, देशभक्ती व मूल्यवर्धित विषयांवरील स्वरचित व अन्यरचित कविता सादर केल्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : ३ री ते ४ थी (अन्यरचित) - परिमल आदिक, प्रज्ञा केदार, आर्यन नवले, आर्यन लहामगे, निखिल पडवळ. ५ वी ते ७ वी (स्वरचित) - विश्वजा काकुळते, सृष्टी जाधव, दीपाली शिंदे, अपर्णा घोडे, अभिजित शिंदे. ५ वी ते ७ वी (अन्यरचित) - ऋषिकेश शिंदे, मोक्षदा कुदळे, सिद्धांत पाटील, साक्षी साळवे, यश बिन्नर, प्राची क्षीरसागर. ८ वी ते १० वी (स्वरचित) - धीरज यादव, सर्वज्ञ ढमाले, माया आढर, प्रथमेश दराडे, गौरव सांगळे. ८ वी ते १० वी (अन्यरचित) - श्रेया साळवे, अक्षदा गांगुर्डे, धीरज यादव, सिद्धी शिरोळे, तेजस पांगारकर, वैष्णवी सानप. ११ वी-१२ वी (स्वरचित) - सुवर्णा घेगडमल, पल्लवी काळे. (अन्यरचित) - कोमल मोकळ, भाग्यश्री नरोडे, अनिता नाजगड. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख, ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव गोपाळ पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी बालकवी काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी डे केअरचे प्राचार्य शरद गिते, एसजीचे मुख्याध्यापक उदय कुदळे, किरण भावसार, भागवत आरोटे, विजय कुमावत, सलीम चौधरी, वृषाली काळे, युनूस शेख, रवींद्र कांगणे, पूनम सोनवणे, पूजा केदार, सोमनाथ थेटे, माधव शिंदे आदी उपस्थित होते.  मेधा शुक्ल, विनायक काकुळते, बापू चतूर यांनी स्पर्धेचे नियोजन केले. पांडुरंग लोहकरे, जयश्री सोनजे, सुधाकर कोकाटे, गणेश सुके, कविता शिंदे, सागर भालेराव, वृषाली जाधव, पद्मा गडाख, भारती नवले, जिजा ताडगे, सतीश बनसोडे, प्रमोद महाजन, नीलेश मुळे, भास्कर गुरुळे, मंदा नागरे, योगेश चव्हाणके, सुवर्णा वारुंगसे, रत्ना चौधरी, ज्योती क्षत्रिय, ज्योती सांगळे, मीना गीत, सुनीता आडके यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)