शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

शाळेला आलो आम्ही

By admin | Updated: June 15, 2015 23:48 IST

शाळेला आलो आम्ही

!पहिला दिवस : विद्यार्थ्यांचे धूमधडाक्यात स्वागत; मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटपनाशिक : ज्यासाठी गेल्या आठवड्यापासून घरोघरी लगबग सुरू होती, त्या शाळेची दोन महिन्यांच्या सुटीनंतर पहिली घंटा आज झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुजनांनी विद्यार्थ्यांच्या हाती फुगे, गुलाबपुष्प, पेढे, चॉकलेट्स देत जंगी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले. उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर आज नियमित शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होण्याचे वेध लागताच घरोघरी मुलांच्या शाळेची तयारी सुरू झाली होती. शालोपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून मेनरोड गजबजून गेला होता. काल रविवारी पालकांनी या तयारीवर अखेरचा हात फिरवला. आज सकाळी नवी दप्तरे खांद्यावर टाकत, नवा गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांनी उत्साहाने शाळा गाठली. डबा, वॉटरबॅग सांभाळत शाळेकडे येणाऱ्या अनेक बालकांचे चेहरे भेदरलेले, रडवेले दिसत होते, तर कोणी एकमेकांशी मस्ती करीत शाळेत येत होते. मुलांना शाळेत सोडवण्यासाठी पालकही मोठ्या उत्साहाने आले होते. त्यामुळे बहुतांश शाळांची आवारे गजबजून गेली होती. शाळेत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षिकांनी ओवाळले. त्यांना गुलाबाचे फूल, खाऊ देण्यात आला. चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. त्या-त्या प्रभागातील नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. वर्गात मुलांना छान बडबडगीते ऐकवण्यात आली, तसेच कथाही सांगण्यात आल्या. (प्रतिनिधी)