यावेळी मनपा प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर साहेब, माजी उपनगराध्यक्ष प्रा. के एन अहिरे सर, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निखिल पवार, देवा पाटील, शरद पाटील, पंकज काबरा, डॉ प्रशांत पाटील, डॉ रोहनी पाटील, प्रदीप पहाडे, स्वच्छता निरीक्षक संदीप कापडे, आदी उपस्थित होते.
राष्ट्र सेवा दल
मालेगाव : राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे आणि तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंखे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी टी. आर. हायस्कूलचे प्राचार्य रमेश पवार, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, सुधीर साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थीतर्फे प्रा. रमेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राज्यमंडल सदस्य नचिकेत कोळपकर यांनी केले. आभार जिल्हा संघटक रविराज सोनार यांनी मानले. याप्रसंगी राज्य मंडळ सदस्य जयेश शेलार, तालुका संघटक सारंग पाठक, ज्येष्ठ सैनिक अशोक पठाडे, राजीव वडगे, हरीश पाठक, राजेंद्र सोनार , योगेश शिंदे, कपिल कनोज, डॉ. अपश्चिम बरंठ, राजू शेगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.