शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही मालेगावकर समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:08 IST

आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देएल्गार : रस्ते विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी

मालेगाव : येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रा. के एन आहिरे, निखिल पवार, देवा पाटील यांनी मालेगाव शहरातील प्रमुख मार्ग सटाणा रोड, ६० फुटीरोड व इतर रस्त्यांचे डांबरीकरण करावे, बांधकाम विभागाच्या वतीनेरस्ते विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईची चौकशी करावी, कामांची गुणवत्ता तपासणी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन केले.महानगरपालिकेच्या हद्दीतील सटाणा रोड, कॅम्प रोड, ६० फुटी रोड व इतर काही प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्यांच्या विकासाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. सन २०१६-१७ पासून मनपा हद्दीतील शासन निधीतून विविध विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पूर्ण केली जात आहेत. यातही दिरंगाई होत आहे. सटाणा नाका ते सोयगाव हा सटाणा रोड, ६० फुटी रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीस प्रचंड त्रास होतो. रस्ता दुभाजकाला सुरक्षा पट्टे कलर करण्यात आलेले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.या मागण्यांचा निवेदनात समावेशमालेगावी मागील वर्षी बनविण्यात आलेला कॉलेजरोडचा वरचा थर उखडला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील सटाणा नाका ते सोयगाव (सटाणा रोड),६० फुटी रोडचे डांबरीकरण करावे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईची चौकशी करण्यात येऊन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दंड वसूल करावा. कॉलेजरोड, कॅम्परोड, सटाणा रोड व इतर रस्त्यांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी आंदोलनकर्र्त्यांशी चर्चा केली.

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप