शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वेतनाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:21 IST

नाशिक : कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कामगार संघटनेसह इंटकने आग्रही भूमिका घेतलेली असताना परिवहनमंत्र्यांनी कामगार दिनाच्या दिवशीच एसटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याची तयारी केली असल्याचे समजते. येत्या २५ तारखेपर्यंत कराराचा मसुदा मंजूर करण्यात येऊन एक मेपासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याचे कळते. दरम्यान, तत्पूर्वी परिवहनमंत्री सर्व कामगार संघटनांशी चर्चा करणार असून, कामगार संघटनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

ठळक मुद्देएसटी कामगार : पुढील आठवड्यात होणार बैठक

नाशिक : कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कामगार संघटनेसह इंटकने आग्रही भूमिका घेतलेली असताना परिवहनमंत्र्यांनी कामगार दिनाच्या दिवशीच एसटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याची तयारी केली असल्याचे समजते. येत्या २५ तारखेपर्यंत कराराचा मसुदा मंजूर करण्यात येऊन एक मेपासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याचे कळते. दरम्यान, तत्पूर्वी परिवहनमंत्री सर्व कामगार संघटनांशी चर्चा करणार असून, कामगार संघटनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.एस. टी. कामगारांना प्रचलित वेतन करारानुसार वेतनवाढ दिली जात असताना एस. टी. कामगार संघटना आणि इंटक यांनी मात्र कामगारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ देण्यात यावी, अशी भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी कामगार संघटनेसह अन्य काही संघटनांनी संघटनेच्या भूमिकेचे समर्थन करीत ऐन दिवाळीत संप पुकारला होता. या संदर्भात अनेक पर्याय समोर आले असतानाही वेतनाचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आयोगानुसार वेतनवाढ शक्य नसल्याचे अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा अजूनही कायम आहे. मात्र आता हा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. परिवहनमंत्री रावते यांनी यावर तोडगा काढला असून, कामगारांना कामगार दिनाच्या दिवशी खूषखबर देण्याची त्यांची योजना आहे.कामगारांना करारानुसार वेतनवाढ मिळणार की आयोगानुसार याबाबतचा स्पष्ट उलगडा झालेला नसला तरी आयोगाप्रमाणे वेतनवाढ शक्य नसल्यामुळे करारात मोठी वाढ होणार असल्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये सुरू आहे. कर्मचाºयांचे किमान बेसिक वेतन १८ हजारांच्या दरम्यान राहील, असा करार करण्यात येणार असून, कर्मचाºयांच्या वेतनात यामुळे घसघशीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.अशाप्रकारची वाढ ही कराराच्या इतिहासात प्रथमच होणार असल्याचे यास सर्वपक्षीय संघटनांची संमती असेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सदर वाढ जाहीर करण्यापूर्वी सर्वचकामगार प्रतिनिधींची मंत्र्यांबरोबर बैठक होणार असून, सर्वमान्य तोडगा निघाल्यानंतरच वेतनवाढीची घोषणा केली जाणार असल्याचे समजते.संघटनेचाच मसुदा मान्य होण्याचा दावाकामगार संघटनेने सातव्या वेतन आयोगाची मागणी लावून धरल्यानंतर तयार केलेल्या मसुद्यात त्यांनी काही सूचनाही सुचविल्या होत्या. त्यानुसार आयोगानुसार वेतनवाढ शक्य नसल्यास कर्मचाºयांना किमान वेतन बेसिक १८ हजार रुपये मिळावे, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे करारातील वाढ याप्रमाणे असल्यास कामगार संघटना विरोध करणार नसल्याचे समजते. त्यामुळे अशा परिस्थितीत वेतनवाढीचे श्रेय एस. टी. कामगार सेना आणि कामगार संघटनादेखील घेण्याची शक्यता आहे.