शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

...चिमुकल्यांनी दाखवला मार्ग

By admin | Updated: January 2, 2017 00:29 IST

येवला : शेतकऱ्यांनी अंगीकारावे व्यापारी धोरण

येवला : कष्टकरी शेतकऱ्यांनी व्यापारीवृत्ती जोपासावी आणि शेती करतानाच व्यापारी म्हणून काम करावे. उत्पादन खर्चावर आधारित भाव आपणच कसा पदरात पडून घ्यावा या उद्देशाचे निमगाव मढ येथील विद्यार्थ्यांनी शाळा आवारातच बाजार भरवून शेतकऱ्यांचे खरे नुकसान कोठे होते हे सप्रयोग सिद्ध करून दाखवले. व्यापारी शेतकऱ्यांकडून शेतमाल अत्यंत कमी किमतीत खरेदी करतात. त्याच मालाची किरकोळ पद्धतीने विक्री करु न दुप्पट - तिप्पट नफा मिळवतात. शेतकरी राब राब राबतो. त्याला उत्पादन खर्च सुटण्याइतपतही पैसा हाती लागत नाही. हीच पद्धत आपल्या कष्टकरी पालकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी निमगाव मढ येथील विद्यार्थ्यांनी शाळा आवारातच बाजार भरवला. अन् आपले खरे नुकसान कोठे होते हे त्यांनी सप्रयोग सिद्ध करून दाखवले.या उपक्रमात निमगाव मढ जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चहा, वडापाव आदिंचे स्टॉल उभारले होते. यासाठी इंधनाची अडचण दूर करण्यासाठी शाळेच्या परिसरामध्ये असलेला पाला-पाचोळा, काड्या-कचरा गोळा करून चूल तयार करून त्या चुलीवर चहा व वडा पाव बनवले. यात लहान मुलांची कृती पाहून शिक्षकांसह पालकांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद झळकत होता. सुट्या पैशांची वानवा असतानादेखील बाजारामध्ये समाधानकारक विक्री झाली. काही विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्याची भूमिका साकारून इतर विद्यार्थ्यांनी विक्र ीसाठी आणलेला शेतमाल त्यांनी कमी भावत खरेदी करून जास्तीचा नफा कसा मिळविता हे दाखवून दिले. बाजारामध्ये सरपंच मनीषा लभडे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता खळे, संजय केणे, हिराबाई लभडे, स्वप्नाली लभडे, राजेंद्र लभडे यांनी विद्यार्थ्यांकडून विविध वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाच्या कौतुकाची थाप दिली. या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थांनीही कौतुक केले. यापुढे असेच उपक्रम राबवावे अशा सूचना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी शाळेच्या शिक्षकांना दिल्या.या मेळाव्यात खाद्यपदार्थांसह भाजीपाला, कटलरी आदि जवळपास ५० ते ६० दुकानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खरेदी-विक्रीचा व्यवसाय करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून येत होता. यात त्याच्या ज्ञानात नक्कीच भर पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ लभडे यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक राजेंद्र ठोंबरे, प्रतिभा चव्हाण, सविता शिरसाठ, रावसाहेब गुंजाळ, ज्योती निर्लेकर, मीना पवार, दादासाहेब वाघमोडे आदिंनी परिश्रम घेतले. शिक्षक व पालकांनी या बाजारात खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. (वार्ताहर)