शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:18 IST

तालुक्यात पश्चिम भागात संततधार पाऊस सुरू असून तुलनेने पूर्व भागात कमी पाऊस होत आहे. तालुक्यातील कोलवण, कादवा, धामण नद्या ...

तालुक्यात पश्चिम भागात संततधार पाऊस सुरू असून तुलनेने पूर्व भागात कमी पाऊस होत आहे. तालुक्यातील कोलवण, कादवा, धामण नद्या खळखळून वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे पालखेड धरणातील पाणीसाठा ९४ टक्के झाला असून, पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात ८०० क्युसेस

पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

दिंडोरीच्या पश्चिम भागामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे वाघाड धरण ८६ टक्के भरले. पावसाचा जोर वाढल्यास दोन दिवसांत वाघाड धरण पूर्ण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण ५४ टक्क्याच्या आसपास पोहचले असून, ननाशी व कोशिबे परिसरात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.

तालुक्यातील मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यामुळे पुणेगाव धरणात मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्पाचे पाणी येण्यास सुरुवात झाल्यामुळे पुणेगाव धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के झाला आहे. पुणेगाव धरण पूर्ण भरल्याशिवाय ओझरखेड धरणामध्ये पाणी येत नसल्यामुळे सध्या धरणाचा पाणीसाठा ३७ इतकाच झाला आहे. तालुक्यात सर्वात कमी पाणीसाठा २२ टक्के तिसगाव धरणाचा असल्यामुळे तिसगाव परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

(१३ दिंडोरी डॅम, १)

130921\13nsk_40_13092021_13.jpg~130921\13nsk_41_13092021_13.jpg

वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर.~दिंडोरी परिसरात समाधानकारक पाऊस.