शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटरप्रूफ’ पतंगांची नाशिककरांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 13:22 IST

पारंपरिक कागदी तसेच प्लॅस्टिक पतंग उडविण्याबरोबरच काहीतरी वेगळेपण हवे यासाठी बाजारात नव्याने दाखल झालेले वॉटरप्रूफ पतंग ग्राहकांना आक र्षित करीत आहेत.

ठळक मुद्देमकरसंक्रांतीवर जीएसटीचे सावटपतंग दरात २५ टक्के वाढ

स्वप्नील जोशीनाशिक : डोरेमॅन, आऊल, बटरफ्लाय, ईगल, सिंड्रेला या आणि अशा विविध आकारातील वॉटरप्रूफ पतंग शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले असून, वेगवेगळ्या आकारातील आणि वेगवेगळया रंगसंगतीतील पतंग खरेदीसाठी तरुणांसह बालगोपाळांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार करता नायलॉन मांजाला बंदी घालण्यात आल्यानंतर आता पतंगप्रेमींना १६ तारी सुती मांजा पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे.पारंपरिक कागदी तसेच प्लॅस्टिक पतंग उडविण्याबरोबरच काहीतरी वेगळेपण हवे यासाठी बाजारात नव्याने दाखल झालेले वॉटरप्रूफ पतंग ग्राहकांना आक र्षित करीत आहेत. दोन फुटांपासून दहा ते बारा फुटांपर्यंतच्या ३० हून अधिक वेगवेगळ्या आकारातील पतंग ३० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. नाशिकच्या बाजारपेठेत मुंबईसह दिल्ली, सुरत, मध्य प्रदेश आदी भागांतून पतंग आणि मांजा उपलब्ध झाला असून, तीन तारी, पाच तारी, आठ तारी, सोळा तारी मांजांना मागणी वाढू लागली आहे.मकरसंक्रांत सणाला अद्याप अवकाश असला तरीही नागरिकांनी विशेषत: विद्यार्थी आणि युवकांनी पतंग खरेदीला सुरुवात केली आहे. पारंपरिक कागदी आणि प्लॅस्टिक पतंग विकत घेताना ग्राहक विशेष काळजी घेताना दिसून येतात. पातळ आणि हलक्या कागदासह पतंगाला लावण्यात येणाºया काड्यांची योग्य खातरजमा करूनच पतंग खरेदी केले जात आहेत. कागदी पतंग दोन रुपयांपासून पंचवीस रुपयांपर्यंत, तर प्लॅस्टिक पतंग एक रुपयापासून २० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पर्यावरण संवर्धनाची चळवळ व्यापक होऊ लागल्याने तसेच नायलॉन मांजाला बंदी असल्याने अनेक पतंग विक्रेत्यांनी पर्यावरणाचे हित जोपासत आपल्या दुकानांमध्ये प्लॅस्टिक पतंगदेखील विक्रीसाठी ठेवलेले नाहीत.