शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाव नसल्याने टरबूज झाले मेंढ्यांचे खाद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:52 IST

खामखेडा : योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या टरबूज पिकाच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन टरबूजचे पीक घेतले. टरबूज काढणीसाठी तयार झाले आणि आचनक भाव कोसळल्याने ते शेतातून काढून बाजारात विकून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने काही शेतकºयांनी टरबूज मेंढ्यांसमोर टाकले आहे. मेंढपाळ टरबूज फोडून मेंढ्यांना खाऊ घालत आहेत.

ठळक मुद्दे वृक्षांची संख्या कमी झाल्याने अगदी अल्पशा झाडांच्या पाल्यावर मेंढीची भूक भागवावी लागत आहे. यंदा उन्हाळ्याच्या दिवसात मेंढ्यांना बाभळीचा पाला-शेंगा चारून कसातरी मे महिना काढला. चालू वर्षी सुरुवातीला चंगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती; परंतु जून महिना सुरू ल

खामखेडा : योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या टरबूज पिकाच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन टरबूजचे पीक घेतले. टरबूज काढणीसाठी तयार झाले आणि आचनक भाव कोसळल्याने ते शेतातून काढून बाजारात विकून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने काही शेतकºयांनी टरबूज मेंढ्यांसमोर टाकले आहे. मेंढपाळ टरबूज फोडून मेंढ्यांना खाऊ घालत आहेत. त्यांच्या मोबदल्यात मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा वाडा शेतकºयाच्या शेतात बसवत आहे. यातून शेतात खत म्हणून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत आहे. ज्या शेतकºयांकडे थोड्याफार प्रमाणात ज्वारीचा हिरवा कडबा आहे तो चारा मेंढपाळांना देऊन रात्रभर मेंढ्या शेतात बसवल्या जातात. यावर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने पाण्याबरोबर चाºयाचा प्रश्न गंभीर बनल्याने मेंढपाळ व्यवसाय धोक्यात आला आहे. दोन-तीन दिवसात मृग नक्षत्राला सुरुवात होईल मात्र पावसाचे चिन्हे नाही. खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे कांद्याची पात चारण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात बाहेर गावचे मेंढपाळ मेंढ्या घेऊन येथे येतात. साधारण एप्रिल माहिन्यापासून कांदा काढणीला सुरुवात होते. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरींना पाणी राहणार नाही म्हणून शेतकºयांनी उन्हाळी कांद्याची लवकर लागवड केली परिणामी काढणी लवकर झाली. एप्रिल महिना संपण्याच्या आतच कांदा काढणी झाल्याने मेंढ्यांसाठी चारा शिल्लक राहिला नाही. तसेच या परिसरातील काही शेतकरी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करीत असे. भुईमुगाची काढणीला साधारण मे महिन्यात सुरु वात होते. तेव्हा भुईमुगाच्या शेतातील गवत व पालापाचोळा मेंढ्यांसाठी चारा म्हणून मिळत असे. त्यामुळे मेंढपाळांचा प्रश्न सुटत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून विहिरींना पाणी नसल्याने उन्हाळी भुईमुगाचे पीक शेतकरी करीत नाही. त्यामुळे यावर्षी मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात चाराटंचाई जाणवू लागली आहे. खामखेडा परिसरात दाखल मेंढ्यांचे चारा-पाण्याअभावी हाल होत आहे.मागच्या वर्षी कांद्याला भाव नसल्याने मेंढपाळ मेंढ्यांसाठी खराब कांदे विकत घेऊन खाद्य म्हणून उपयोग करीत होते. यावर्षी खराब कांद्यालाही भाव असल्याने महाग कांदा विकत घेऊन मेंढ्यांना खायला घालणे परवडत नाही. पूर्वी शेतात गावठी बाभळाची लिंबाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे लिंब-बाभळीच्या पाल्यावर भागत असे. परंतु आता वृक्षांची संख्या कमी झाल्याने अगदी अल्पशा झाडांच्या पाल्यावर मेंढीची भूक भागवावी लागत आहे. यंदा उन्हाळ्याच्या दिवसात मेंढ्यांना बाभळीचा पाला-शेंगा चारून कसातरी मे महिना काढला. चालू वर्षी सुरुवातीला चंगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती; परंतु जून महिना सुरू लागूनही पावसाचे काही चिन्हे नाही. त्यामुळे मेंढीपालन व्यवसाय धोक्यात आला आहे.