शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावात ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:00 IST

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वडाळावासीयांवर दोन दिवसीय जलसंकट ओढावले.

ठळक मुद्देप्रतीक्षेनंतर गावात येणाºया टॅँकरवर महिलांची झुंबड याबरोबरच पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वडाळावासीयांवर दोन दिवसीय जलसंकट ओढावले. हे संकट पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अधिक भयावह झाल्याचे चित्र गुरुवारी (दि.५) सकाळी पहावयास मिळाले. पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षेनंतर गावात येणाºया टॅँकरवर महिलांची झुंबड उडाली, तर एका भागात संतप्त महिलांनी रिकामे हंडे टॅँकरच्या दिशेने भिरकावत महापालिके च्या गलथान कारभाराचा निषेधही नोंदविला.जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती रोखण्यासाठी मंगळवारपासून महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने ज्या भागांमधील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर या दुरुस्ती कालावधीत परिणाम होणार आहे, त्या परिसराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले; मात्र याबरोबरच पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर संंबंधित अधिकाºयांना पडल्यामुळे वडाळागाव परिसरात पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे दोन दिवसांपासून आतोनात हाल होत आहे. लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंतच कुटुंबांमधील सर्वच सदस्य पाण्याच्या शोधात हंडे, कळशी, बादली घेऊन घराबाहेर भटकंती करताना बुधवारपासून दिसून येत आहे. ज्या भागात टॅँकर पोहचला त्या भागात धाव घेऊन मिळेल तेवढे पाणी घेत घर गाठायचे असा जणू उपक्रमच बुधवारपासून दोन दिवस वडाळावासीयांचा सुरू होता. अपुरे टॅँकर आणि त्यामुळे उद्भवणारे भांडण सोडविताना नगरसेवकांच्याही नाकीनव आले. काही परिसरात नगरसेवकांना महिलांच्या रोषाचा सामनाही करावा लागल्याचे दिसून आले. अवघे दोन टॅँकरद्वारे वडाळागावाची तहान भागाविण्याचा पोरखेळपणा महापालिकेच्या प्रशासनाने केला हे विशेष! यामुळे ओढावलेले जलसंकट अधिक वाढले आणि नागरिकांचा संतापही यामुळे दिसून आला. ज्या भागात टॅँकर पोहचले त्या भागातील लोक आनंदी मात्र दुसºया भागातील लोकांनी तिकडे धाव घेतल्यास आपापसांत भांडण होऊन हंड्यांची फेकाफेकही झाली.आज हवा पुरेसा पाणीपुरवठादोन दिवसांपासून वडाळागाव परिसरात पाणीपुरवठा बंद होता, त्यामुळे वडाळागावात शुक्रवारी तरी जादा दाबाने व पुरेशा वेळेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शुक्रवारी कृत्रिम पाणीटंचाईची समस्या उद्भवणार नाही, याबाबत प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे. दोन दिवसांपासून ‘पाणीबाणी’ वडाळावासीयांवर झाल्यामुळे शुक्रवारच्या दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून देण्याची किंवा सकाळ-संध्याकाळ पाणीपुरवठा करण्याची मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.