शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात विजेच्या चाकावर कुंभारकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:56 IST

नाशिक : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ अंतर्गत दहादिवसीय कुंभार काम कला प्रशिक्षणाचा शुभारंभ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या त्र्यंबक विद्यामंदिर येथे करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन माती कला बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय कुंभार आणि खादी ग्रामोद्योग कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देअंध कारागिरांचाही सहभाग : व्यावसायिक हातभार

नाशिक : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ अंतर्गत दहादिवसीय कुंभार काम कला प्रशिक्षणाचा शुभारंभ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या त्र्यंबक विद्यामंदिर येथे करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन माती कला बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय कुंभार आणि खादी ग्रामोद्योग कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्रातील कुंभार व्यावसायिक कौशल्यपूर्ण काम करीत असले तरी आजही बहुतेक व्यावसायिक पारंपरिक पद्धतीने आणि कोणत्याही यंत्रसामग्रीचा वापर न करता हातानेच कुंभार काम करीत असतात. पारंपरिक पद्धतीमुळे मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होत असल्याने कुंभार व्यावसायिकांना म्हणावा तसा आर्थिक लाभ होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र शासनाने शासनाने विजेच्या चाकावर कुंभार कलेचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या मोहिमेअंतर्गत प्रशिक्षणात ४० कुंभार व्यावसायिक सहभागी झाले आहेत. या आधुनिक यांत्रिक पद्धतीमुळे कुंभार समाजातील तरुण पिढी पुन्हा एकदा पारंपरिक व्यवसायाकडे वळेल यामुळे समाजापुढील बेरोजगारीच्या समस्येवर उपाय निघू शकेल. शिवाय सध्या गुजरात राज्यातून यांत्रिकीकरणामुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक स्पर्धेला तोंड देता येईल, असे जाणकारांचे मत आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीला भविष्यात व्यवसाय सक्षमपणे करता यावा यासाठी१८ हजार रुपये किमतीचे विजेवरील कुंभारी चाक सवलतीत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वीस कुंभारांच्या एका गटाला माती मळण्याचे यंत्रही सवलतीत देण्यात येणार आहे.कुंभार कामातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण बोरसरे आणि सतीश बोरसरे हे शिबिरार्थींना विजेवर चालणाऱ्या कुंभारी चाकावर विविध उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणार्थींमध्ये दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले साठ वर्षे वयाचे कुंभार कारागीर येवला तालुक्यातील माधवराव शिरसाठ हेदेखील सहभागी झाले आहेत.