शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबाणी : नाशिकरोडसह पूर्व विभागात नागरिकांचे हाल महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:50 IST

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन इंडिगो पार्कजवळ नादुरुस्त झाल्याने तिचे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले.

ठळक मुद्देपूर्व विभागातील प्रभागांमधील नागरिकांचे प्रचंड हालपरंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन इंडिगो पार्कजवळ नादुरुस्त झाल्याने तिचे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले. परंतु, दुरुस्ती कामाचा अंदाज न आल्याने मनपाच्या या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे, दि. ३ ते ५ एप्रिलपर्यंत सलग तीन दिवस नाशिकरोड आणि पूर्व विभागातील प्रभागांमधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (दि.६) कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन सोमवारी (दि.२) नादुरुस्त झाली होती. त्यानुसार, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर परिपत्रक काढून दि. ३ एप्रिल रोजी नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक १६, १७, १८, १९, २०, आणि पूर्व विभागातील २१, २२, २३ आणि ३० मध्ये दिवसभर पाणीपुरवठा होणार नसल्याचे नागरिकांना कळविले. पाणीपुरवठा विभागाने सदर पाइपलाइन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे गरजेचे होते. परंतु, दुरुस्त कामासंदर्भात निर्णय घेण्यासच विलंब लागला गेला आणि मंगळवारी कामच झाले नाही. त्यामुळे, बुधवारी (दि.४) कामास सुरुवात झाली.परिणामी, बुधवारीही पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान, दुरुस्ती कामातील गुंतागुंत वाढत गेल्याने गुरुवारी (दि.५)देखील महापालिकेला सदर भागात पाणीपुरवठा करता आला नाही. पाणीपुरवठा विभागाने सदर कामाचा अंदाज घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे होते. परंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला आणि सलग तीन दिवस पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी या दोन दिवशी नागरिकांनी साठविलेल्या पाण्याचा कसाबसा वापर केला. परंतु, सलग तिसऱ्या दिवशी पाणी न आल्याने गुरुवारी (दि.५) मात्र नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नागरिकांना खासगी टॅँकर मागवून पाण्याची सोय करावी लागली, तर नाशिकरोड विभागीय कार्यालयाकडून वाहनचालक नसल्याचे उत्तर ऐकायला मिळाले.सलग तीन दिवस पाणीपुरवठा होऊ न शकल्याने पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. सदर पाइपलाइन ही सीमेंटची असल्याने सावधपणे काम करणे आवश्यक होते. जराशी कुठे चूक झाली असती तर इतर पाइपलाइनला धोका होता. दोन दिवसांत महापालिकेकडे पाणीपुरवठ्या संदर्भात सुमारे ४० तक्रारी आल्या. याशिवाय, महापालिकेच्या आठ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.