शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राममध्ये पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: September 8, 2015 23:49 IST

साधुग्राममध्ये पाण्याचा अपव्यय

नाशिक : एकीकडे शहरावर पाणी कपातीचे संकट असताना साधुग्राम परिसरात मात्र काही ठिकाणी पाण्याचे नळ धो धो वाहताना दिसतात. शहर परिसरातील सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर भागात कमी दाबाने पाणी येत असताना साधुग्राममध्ये मात्र २४ तास पाण्याचे नळ सुरू असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याकडे पाणीपुरवठा विभागासह कोणाचेच लक्ष नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात केवळ ५८ टक्के पाणी साठा असल्याने पावसाची अवकृपा झाल्यास शहरातील नागरिकांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे करोडो रुपये खर्चून साधुग्राममध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने वीज, पाणी, रस्ते आदिंसह सर्व मूलभूत सोयी पुरविण्यात आल्या असल्या तरी, सर्व काही मोफत मिळत असल्याने त्याची कोणाला किंमत नाही किंबहुना पर्वादेखील दिसत नाही.सेक्टर- २ मध्ये अनेक खालशांजवळ अशीच नळगळती सुरू आहे. अनेक खालशांमध्ये साधू-महंतांसाठी स्नानाच्या व्यवस्थेसाठी तात्पुरते बाथरूम तयार करण्यात आल्याने त्याठिकाणी नळांची गळती सुरूच दिसते. तर शौचालये मात्र पाणी न टाकल्याने घाणीने भरलेले दिसतात. सेक्टर तीन व चारमध्ये फारशी गर्दी नसल्याने तिकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जणू काही बेवारसपणे नळ सुरू असतात. तपोवन पोलीस चौकीलगतच पाण्याची टाकी असून, याठिकाणी पिण्याच्या पाण्याला शुद्धीकरण यंत्र बसवून पुरवठा केला जातो. मात्र भाविक हातपाय धुणे, तोंड धुणे यासाठी सतत नळ सुरू ठेवतात. परंतु तेथे उभे असलेले मनपा कर्मचारी, स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते किंवा पोलीस कुणीही याबाबत हटकत नाही.