शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

कालवा चारी फोडल्याने पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: September 22, 2015 22:52 IST

कालवा चारी फोडल्याने पाण्याचा अपव्यय

देवळा : चणकापूर उजव्या कालव्याला चणकापूर धरणातील पाणी सोडल्यानंतर कालवा फोडण्याचे किंवा चारीचे गेट उघडून देण्याच्या घटना दरवर्षी सातत्याने घडत आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो क्यूसेक पाणी वाया जाते व रामेश्वर धरण भरण्यास विलंब झाल्याने तालुक्याचा पूर्व भाग पाण्यापासून वंचित राहतो आहे; मात्र याकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याने अशा गैरप्रकारांमध्ये वाढ होत आहे. रविवारी (दि. २०) चणकापूर उजव्या कालव्याला चणकापूर धरणातील पूरपाणी सोडल्यानंतर वरवंडी येथे ११ नंबरच्या चारीचे गेट अज्ञात इसमांनी फोडल्याने रामेश्वर धरणात कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद झाला. सोमवारी दुपारी देवळा व कळवण येथील पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ११ नंबरची चारी बंद केल्यानंतर कालव्याला पूर्ववत पाणी वाहू लागले. यामुळे रामेश्वर धरण लवकर भरून कोलती नदीला पाणी येईल, या प्रतीक्षेत येथील ग्रामस्थ आहेत.तालुक्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. रामेश्वर धरण वगळता वार्शी, दोडी, कोलते, वडाळा, कनकापूर येथील सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. चणकापूर उजवा कालवा सुरळीतपणे चालल्यास रामेश्वर धरण लवकरच १०० टक्के भरेल् अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील वरवंडी येथे पाऊस झाल्यानंतर डोंगरउतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्यावर बांधलेली भूमिगत मोरी गाळाने भरून बंद झाल्यामुळे डोंगरउतारावरील सर्व पाणी कालव्यात वाहून जात असल्याने वरवंडी गावाला नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून, जुन्या मोरीच्या जागेवर अधिक क्षमतेची नवीन मोरी (सुपर पॅसेंजर) बांधण्याची मागणी केली आहे. चारी नं. ११ शेजारी असलेली मोरीदेखील गाळाने भरली. या नाल्यावर पुढे सात नालाबांध पद्धतीचे बंधारे आहेत. परंतु डोंगराचे पाणी अडवले जाऊन ते उजव्या कालव्यात वाहून जाते. यामुळे हे नालाबांधदेखील कायम कोरडेच राहतात. मोरीच्या सदोष कामामुळे ह्या नालाबांधासाठी शासनाने केलेला खर्चदेखील वाया गेला असून, कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर वरवंडी गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या मोरीशेजारीच भाऊसाहेब आहेर यांची (गट नं. ६) शेती आहे. मोरी गाळाने भरल्याने डोंगरउतारावरील पाणी त्यांच्या शेतात शिरत असल्याने त्यांचे सोयाबीन व बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे. असे नुकसान त्यांना दरवर्षी सोसावे लागते. पाण्यामुळे कालव्याचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. भर वाहून गेल्याने काही जागांवर भगदाड पडली आहेत. डोंगरउतारावरून वाहून येणारा गाळ कालव्यात साठत असल्याने आधीच कमी असलेली कालव्याची वहनक्षमता आणखी कमी होऊ शकते. मोठा पाऊस झाला व अधिक क्षमतेने कालव्याला पाणी सोडल्यास कालव्याला धोका निर्माण होऊ शकतो. सदरचा कालवा तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. यापूर्वी वरवंडी ग्रामपंचायतीने मोरी दुरुस्त करण्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव दिला असून, अनेक वेळा तक्रारी करूनही पाटबंधारे विभाग यासंबंधी ठोस पावले उचलत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. (वार्ताहर)