शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खैरेवाडीला प्रथमच मिळाला पाण्याचा टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:21 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या खैरेवाडी या दुर्गम आदिवासी गावात श्रमजीवी संघटना आणि पंचायत समितीच्या समन्वयाने पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देघोटी : श्रमजीवी अन् प्रशासनाच्या समन्वयातून टंचाईवर मात

घोटी : इगतपुरी तालुक्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या खैरेवाडी या दुर्गम आदिवासी गावात श्रमजीवी संघटना आणि पंचायत समितीच्या समन्वयाने पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला.गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी याबाबत माहिती मिळताच तातडीने पाण्याची समस्या सोडवली म्हणून ग्रामस्थांनी त्यांचे कौतूक केले.इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे या ग्रामपंचायतीअंतर्गत खैरेवाडी ही आदिवासी वाडी आहे. ग्रामस्थांना तीन किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. यासह गावात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्याने दुष्काळात तेरावा महिना सोसावा लागतो. पाणीटंचाईचा दाह वाढत चालल्याने श्रमजीवी संघटनेने इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्याकडे कैफियत मांडली. पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी रस्त्याची अडचण असल्याने ग्रामस्थ आणि श्रमजीवी संघटनेने श्रमदान करून तात्पुरता रस्ता बनवला. गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधून तातडीने या गावी पाण्याचा टँकर सुरू केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच यागावी टँकर आल्याने आदिवासी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.प्रतिक्रि याखैरेवाडी गाव अतिदुर्गम भागात असल्याने सुविधा पूरवतांना तांत्रिक समस्या उदभवतात. यावर मात करून आज तातडीने पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला. श्रमजीवी संघटनेने याप्रश्नी प्रशासनाला मदत केली. भविष्यात ह्या गावाला टंचाईमुक्त करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.- किरण जाधव, गटविकास अधिकारी, इगतपुरी.स्वातंत्र्यानंतर प्रथमच खैरेवाडी गावाला पाण्याचा टँकर देऊन प्रशासनाने दखल घेतली. या गावाला तृषार्थता राहू नये म्हणून श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले.- भगवान मधे, सरचिटणीस, श्रमजीवी संघटना.