शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण शहरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

By admin | Updated: March 8, 2017 01:14 IST

नाशिक :आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याने महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याने अखेर महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सूचना आणि तांत्रिक अभिप्रायाच्या आधारे यापुढे संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार वगळता इतर दिवशी एकवेळ पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. दरम्यान, गंगापूर धरणातील घटत चाललेला पाणीसाठा लक्षात घेता महापालिकेने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.  गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला सोडल्यानंतर आणि शासनाने महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात केल्याने महापालिकेने दि. ९ आॅक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर, महासभेने नोव्हेंबर २०१५ मध्येच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा ठराव केला होता, परंतु पाण्याच्या मुद्द्यावरही राजकारण झाल्याने प्रशासनाची निर्णय घेण्याबाबत कोंडी होत राहिली. दरम्यान, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभाग यांनी गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपवत ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे बंधन घातले आणि प्रशासन जागचे हलले. विभागीय आयुक्तांच्या बैठकीत ठरल्यानुसार विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय आयुक्तांनी स्वीकारला आणि दि. २२ फेबु्रवारी २०१६ पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली. परंतु, जलशुद्धीकरणनिहाय विभागवार पाणी वितरणात मोठ्या प्रमाणावर होणारी गळती, तसेच तांत्रिक अडचणी पाहता प्रशासनाची दमछाक व्हायला लागली. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा नियोजन बदलावे लागले. अखेर महापौर, आयुक्त यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात तांत्रिक अभिप्राय मागविण्यात आला. महापालिका आयुक्तांनी यापुढे आठवड्यातील दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याची लगेचच अंमलबजावणी गुरुवार वगळता इतर दिवशी नियमितपणे एकवेळ पाणीपुरवठा सुरूच राहणार आहे. परिणामी, नागरिकांना आता दर बुधवारी पाण्याचा साठा करून ठेवणे क्रमप्राप्त ठरणार आहे. (प्रतिनिधी)