शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती सुधार योजनेतीलपाणीपुरवठ्याची कामे प्राधान्यक्रमावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:27 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांपैकी दलित वस्ती सुधार योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून या योजनांमधील कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या.

ठळक मुद्देरस्ता कॉँक्रिटीकरण करणे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांपैकी दलित वस्ती सुधार योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून या योजनांमधील कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची सभा सभापती चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती घेतली. अपूर्ण कामांचा तपशील आणि कामांना होणाºया विलंबाबतही त्यांनी अधिकाºयांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले. समाजकल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना राबविली जाते. या योजनेचा आढावा घेताना प्रलंबित मानधन आणि मानधनाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास करणे, तांडावस्ती अपंग बीज भांडवल, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकूण ३६.११ कोटींचे ९१६ प्रस्ताव प्राप्त झालेले असून, प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर सदर परिपूर्ण असलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्णात दुष्काळाचे सावट असल्याने दलित वस्ती सुधार योजनेत दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला.नाशिक तालुक्यातील गणेशगाव येथील रस्ता कॉँक्रिटीकरण करणे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार हिरामण खोसकर यांनी केली. या कामांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.या बैठकीस हिरामण खोसकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, रमेश बरफ, कन्हू गायकवाड, विद्या पाटील, शोभा कडाळे उपस्थित होते. दर्जा राखण्याची सूचनादलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या कामांची गुणवत्ता व कामांची तपासणी होत नसल्यामुळे अनेक कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे केलेल्या कामांचा लवकर बोजवारा उडतो आणि केलेल्या कामांचा लाभदेखील होत नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागामार्फत होणाºया कामांचा दर्जा राखला जावा, अशी सूचना चारोस्कर यांनी यावेळी केली.