शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:24 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या टप्प्यात ४० तर अवकाळीच्या तडाख्याने ३ अशा एकूण ४३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा तडाखा व पुरामुळे पाणीपुरवठा योजना नादुरुस्त होण्याबरोबरच काही योजनांचे पाईपच वाहून गेले आहेत. त्यामुळे या योजनांच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा तडाखा : शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या टप्प्यात ४० तर अवकाळीच्या तडाख्याने ३ अशा एकूण ४३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा तडाखा व पुरामुळे पाणीपुरवठा योजना नादुरुस्त होण्याबरोबरच काही योजनांचे पाईपच वाहून गेले आहेत. त्यामुळे या योजनांच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे.प्राप्त झालेल्या तक्रारीवरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने, पाणीपुरवठा योजनांची पाहणी केली असता त्यात निफाड तालुक्यातील १८ गावांमधील योजनांचे नुकसान झाले तर देवळा तालुक्यातील एका योजनेला पावसाचा फटका बसला आहे.सिन्नर तालुक्यातील गावांमधील ११ योजनांचे नुकसान झाले आहे. नाशिक तालुक्यातील १० गावांमधील योजनांना पावसाचा फटका बसला असून, या सगळ्याच योजनांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी १३ लाख ६९ हजार रुपयांची गरज आहे. असे असतानाच दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्णाला पुन्हा झोडपून काढल्यामुळे त्याचा फटका चांदवड तालुक्यातील दहेगाव-मनमाड पाणीपुरवठा योजनेला बसला आहे.योजनेचा उद्भव असलेल्या विहिरीच्या आजूबाजूचा काँक्रीटचा भराव वाहून गेला आहे. तसेच पंपिंग हाउसच्या बाजूचाही भराव वाहून गेला. तीन इंच व्यासाची शंभर मीटर लांबीची पाइपलाइन वाहून गेली. या योजनेचे एकूण सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या हातपंपाद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. सटाणा तालुक्यातील निताणे येथील योजनेच्या विहिरीचे कंपाउंड पावसाने वाहून गेले आहे.मोसम नदीच्या काठावर ही विहीर असून त्याचेही दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मालेगाव ताालुक्यातील सौंदाणे पाणीपुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेतील पाइपलाइनचे नुकसान झाले आहे. गलाटी नदीचे पाणी गावात शिरल्याने योजनेला फटका बसला असून, दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासंदर्भात नुकसानाची अहवाल शासनाकडे सादर केला असून, दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीची मागणी ही करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनीदिली.नदीकाठच्या शेतमालाचे मोठे नुकसानजिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले असले तरी, जुलै अखेरीस त्याने दमदार हजेरी कायम ठेवली. त्यामुळे आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन नद्या, नाल्यांना पूर आले. त्यातही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदावरी नदीला महापूर येऊन नदीकाठच्या गावांमधील शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या पुराचा फटका शेतमालासह जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांनाही बसला.

टॅग्स :godavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषण