शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठाही ठप्प : वीज सेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:57 IST

नांदगाव : राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळू लागल्याने या कामाचा परिणाम वाहतूक कोंडीसोबत आता शहरातील पाणीपुरवठा व वीजपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या सेवेवर झाला आहे.

नांदगाव : राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळू लागल्याने या कामाचा परिणाम वाहतूक कोंडीसोबत आता शहरातील पाणीपुरवठा व वीजपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या सेवेवर झाला आहे. मनमाड वळण रस्त्यापासून सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या या कामाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या वीजवाहक तारा व खांब शिफ्ट करण्याच्या नावाखाली गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दूरध्वनी विभागाच्या सेवेलाही त्याची झळ पोहोचली आहे. शिवाय काही ठिकाणी पालिकेच्या पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्याही हटविण्यात आल्याने नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.सर्वात महत्त्वाचे ग्राहकांना भारनियमन नसतानाही खंडित वीजपुरवठ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळत असलेल्या कामाबाबत तीन आठवड्यापूर्वी आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महामार्गाचे अभियंता व ठेकेदारांना कामाला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र या महामार्गाचे काम अजूनही न्यू इंग्लिशच्या पुढे सरकू शकलेले नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात एकेरी वाहतुकीची कोंडी बघावयास मिळते.महामार्गाच्या कामातली शिथिलता अशीच सुरू राहिली तर परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्यासाठी वेठीला धरले जाणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. सदर काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.----------------------विद्यार्थ्यांची गैरसोयकोरोनामुळे विद्यार्थी घरूनच आॅनलाइन अभ्यासक्र माला संलग्न झाले असल्याने या खंडित वीजपुरवठ्याची झळ त्यांनाही बसली आहे. वीजपुरवठा किती काळासाठी खंडित होणार याबाबतचे नियोजन नसल्याने या गोंधळात भर पडली आहे. विद्यार्थ्यांचा वीज नसल्याने नाहक वेळ वाया जात आहे.-------------संबंधित विभागाने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी मिळविली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे.- किरण कांडेकर,शहर अभियंता, नांदगाव

टॅग्स :Nashikनाशिक