शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात यंदा पाणीप्रश्नी दिलासा

By admin | Updated: May 28, 2014 01:01 IST

येवला : तालुक्यात यंदा पाणीटंचाई प्रश्न मागील वर्षीच्या तुलनेत कमी भेडसावत असून, केवळ १४ गावे व नऊ वाड्यांना, सहा टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी २८ मेपर्यंत ४९ गावांसह ३७ वाड्यांवर पाणीटंचाईची झळ जाणवली होती व तब्बल २५ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला गेला होता. ३८ गाव पाणीपुरवठ्यासह पालखेडचे आवर्तन व प्रशासनाचे पाणीटंचाईसाठीचे नियोजन व उपाय या सार्‍या गोष्टीमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली आहे.

येवला : तालुक्यात यंदा पाणीटंचाई प्रश्न मागील वर्षीच्या तुलनेत कमी भेडसावत असून, केवळ १४ गावे व नऊ वाड्यांना, सहा टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी २८ मेपर्यंत ४९ गावांसह ३७ वाड्यांवर पाणीटंचाईची झळ जाणवली होती व तब्बल २५ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला गेला होता. ३८ गाव पाणीपुरवठ्यासह पालखेडचे आवर्तन व प्रशासनाचे पाणीटंचाईसाठीचे नियोजन व उपाय या सार्‍या गोष्टीमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली आहे. येवला पंचायत समिती प्रशासनाने सन २०१३-१४ साठी पाणीटंचाई कृती नियोजन आराखड्यात तिसर्‍या टप्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत ५४ गावे व ३३ वाड्या अशा एकूण ८७ ठिकाणी पाणी पोहचवावे लागेल असे नियोजन केले होते. परंतु या नियोजनात ५४ प्रस्तावित गावांपैकी केवळ १४ गावांना, तर ३३ वाड्यांपैकी केवळ सहा वाड्यांनाच पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती आहे. प्रशासनाने गृहीत धरलेल्या गावांपैकी केवळ २५ टक्के गावे, २० टक्के वाड्यांनाच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे लागले. तालुक्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत निश्चित सुधारणा झाल्याची आकडेवारी आहे. सध्या खैरगव्हाण, तांदूळवाडी, गोपाळवाडी या तीन ठिकाणची पाणी टँकर मागणी येवला पंचायत समितीकडे आली आहे. येत्या दोन दिवसांत टँकर मंजुरीचे अधिकारही स्थानिक प्रांत कार्यालयाकडे येण्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. यामुळे गावांकडून मागणी आली की, तत्काळ सर्वे व प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक तेथे टँकर अशी भूमिका तहसीलदार शरद मंडलिक यांची आहे. -येवला तालुका पाणीटंचाई गावे व वाड्या-महालगाव, मुरमी, आहेरवाडी, देवरगाव, तळवाडे, बाळापूर, कासारखेडे, निळखेडे, गुजरखेडे, हडपसावरगाव, लहीत, जायदरे, चांदगाव, पांजरवाडी - १४ गावे-----------घनमाळी मळा(नगरसूल), शिवाजीनगर (तळवाडे), महादेववाडी (सायगाव), वडाचा मळा, आमदारवस्ती, पहाडेवस्ती, चिखलेवस्ती, मुळबाई घाट, कटकेवस्ती, कापसेवस्ती - ९ वाड्या-वस्त्या-------बॉक्स : गावाची पाणी टँकरची मागणी येताच गटविकास अधिकार्‍यासह संबंधित गावाला तत्काळ व्हिजिट होऊन तपासणी होते व आवश्यक असल्यास टँकर मंजुरीसाठी प्रस्ताव दोन दिवसांत प्रांत कार्यालयाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी जातो. पाणीटंचाईच्या नियोजनाला व कार्यवाहीला इतर कामापेक्षा अग्रक्रम दिला जातो. -शरद मंडलिक, तहसीलदार येवला