शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:30 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे ३० ते ३५ टीएमसी पाणी वाहून गेल्याने यंदा गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी देण्याची गरज भासणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने मुबलक पाणीसाठ्यामुळे नाशिककर निर्धास्त झाले आहेत.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे ३० ते ३५ टीएमसी पाणी वाहून गेल्याने यंदा गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी देण्याची गरज भासणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने मुबलक पाणीसाठ्यामुळे नाशिककर निर्धास्त झाले आहेत.गंगापूर धरणातील पाणीसाठ्यावर नाशिककरांचा वर्षभराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. दोन वर्षांपूर्वी, मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीमुळे गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्याने नाशिककरांनी पाणीकपातीच्या माध्यमातून टंचाईची धग अनुभवली होती. त्याचे तीव्र पडसादही उमटले होते. त्यानंतर, मागील वर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होऊन धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती परंतु, पुन्हा जायकवाडीसाठी पाणी जाण्याची चिंता होती.परंतु, तशी वेळ जलसंपदा विभागावर आली नाही. यंदा, फेब्रुवारीतच हवामान खात्याने सरासरीइतक्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने नाशिककर सुखावले होते. जून आणि जुलै या दोन महिन्यांत वरुणराजाने नाशिक शहरावर कृपावृष्टी केली.आर्द्रा आणि पुनर्वसू तसेच पुष्य नक्षत्रातील पावसाने भरभरून हजेरी लावली. पावसाच्या संततधारेमुळे जुलैच्या मध्यातच गंगापूर धरणातून विसर्ग करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली आणि लोकप्रतिनिधींनाही जलपूजनाची लवकर संधी लाभली. जुलै महिन्यात अधिक काळ गोदावरी दुथडी भरून वाहण्याची अनुभूती नाशिककरांनी घेतली. दि. ५ आॅगस्ट अखेर गंगापूर धरणात ४६८२ दलघफू म्हणजे ८३ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ७९ टक्के पाणीसाठा होता. गंगापूर धरण समूहात ९१६२ दलघफू पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ८९ टक्के आहे. आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे, तर काश्यपी आणि गौतमी गोदावरीने ९० टक्क्याच्या वर पाण्याची पातळी गाठली आहे. नाशिकरोड भागाला पाणीपुरवठा करणाºया दारणा धरणातही ६५२७ दलघफू म्हणजे ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. दोन महिन्यांतच गंगापूर धरण व समूहात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.