शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीयोजनांची पूर्तता व्हावी

By admin | Updated: May 10, 2016 22:13 IST

पाणीयोजनांची पूर्तता व्हावी

प्रवीण दोशी  वणीपाणीटंचाईच्या तीव्रतेचा सामना करण्यासाठी वणी शहरासाठीची नूतन पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असली, तरी पर्यायी उपलब्ध पाणीस्रोतावरील मर्यादा पाहता पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यासाठी योजनापूर्तीची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे. वणी हे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे शहरी वर्गात मोडणारे गाव असून, पंचवीस हजारांच्या पुढे लोकवस्ती आहे. नवीन जलकुंभाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सरपंच मधुकर भरसठ, विलास कड, राजेंद्र गोतरणे, सुनील बर्डे, मनोज शर्मा आदि प्रयत्नशील आहेत. जलशुद्धीकरण केंद्र, सहा किलोमीटर नवीन जलवाहिनी, शहरातील काही भागात नवीन जलवाहिन्या, जलकुंभ अशा कामांचा प्रकल्पात समावेश आहे.विविध तांत्रिक अडचणींचा सामना करीत जॅकवेल, पंपहाऊस, अशुद्ध जल पंप संयत्रे, अशुद्ध जल ऊर्ध्ववाहिनी या सर्व बाबींची पूर्तता अंतिम स्तरावर आहे. सन २००९-१० पासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म राबविण्यात येत आहे. दोन कोटी ते साडेसात कोटींपर्यंतच्या स्वतंत्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना, तर पुढील मुख्य अभियंत्यांना आहेत. या सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेता नियमितपणे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेची पूर्ती होणे आवश्यक आहे. नुकतीच पंचायतराज समितीने दिंडोरी तालुक्याला भेट देऊन तीन महिन्याच्या आत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे. त्या सूचनेची पूर्तता झाली तरच शहराची पाणीटंचाई दूर होईल. दरम्यान, भातोडे, अहिवंतवाडी, मुळाणे, बाबापूर, तळेगाव व परिसरातील गावे, खेडे, पाडे पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत.विहिरी, बोअरवेल काही ठिकाणी कोरडेठाक पडले आहेत, तर पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याची समस्या उभी ठाकली आहे. वेल रिचार्ज व रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा उपायांमुळे पाणीटंचाईची समस्या प्रभावीपणे सोडविली जाऊ शकते. मात्र त्यास गरज आहे जनजागृती व सांघिक प्रयत्नांची.