शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पेठच्या १०० वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:47 IST

पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

ठळक मुद्देसिंचन प्रकल्पांची वानवा : नदीपात्र कोरडेठाक पडल्याने जनावरेही पाण्यापासून वंचित

पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.तालुक्यात जवळपास २०० गावे-वाड्या असून, पैकी दरवर्षी १०० वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात परिसरात मोेठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी सिंचन प्रकल्पांची वानवा असल्याने उन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची दयनीय अवस्था तालुक्यात पहावयास मिळते.तालुक्यात लहान-मोठी अशी आठ धरणे आहेत; मात्र त्यांची क्षमता कमी असल्याने सिंचनक्षेत्रही त्याच मर्यादेत येत असल्याने डोंगर उतारावर असलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. यावर्षी पेठ तालुक्याची पावसाची सरासरी समाधानकारक दिसत असली तरीही प्रारंभीच्या काळात पडलेला पाऊस शेवटपर्यंत टिकून न राहिल्याने खरिपाची पिके वाया जाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. नदीपात्र कोरडे पडत असल्यामुळे जनावरांना पाणी पाजण्यासाठी रानातून गावातील घरी आणावे लागते. भीषण पाणीटंचाईमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, गावे ओस पडू लागली आहेत. सध्या निवडणुकांचा धुराळा उडत असल्याने राजकारण्यांचे पाणी व रोजगारापेक्षा निवडणुकांकडे अधिक लक्ष लागून असल्याने सध्या तरी केवळ प्रशासनावर टंचाई निवारणाची भिस्त आहे. आदिवासी भागातील वाडी-वस्तीवर भीषण पाणीटंचाईमुळे स्थलांतर करण्याची नागरिकांवर वेळ आली असून, शासन टंचाई निवारणासाठी करीत असलेल्या अपूर्ण उपाययोजना व नियोजनाचा अभाव यामुळे अनेक गावांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून सोशल नेटवर्किंग फोरमसारख्या सामाजिक संस्थांनी आपला हात पुढे केला आहे. शासन अनुदानातून रखडलेल्या पाणी योजना लोकसहभागातून पूर्णत्वास नेऊन सोशल नेटवर्किंग फोरमने आदिवासी भागातील जवळपास ११ गावे टंचाईच्या कचाट्यातून मुक्त केली आहेत. तसेच आपुलकी सामाजिक सेवाभावी ग्रुपच्या वतीने गावांना व शाळांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप करून या टंचाईच्या झळांपासून नागरिकांना मुक्त करण्याचे काम केले आहे.पेठ तालुक्यात आठ लघुसिंचन प्रकल्प असले तरी त्यापैकी हरणगाव व इनामबारी या दोन धरणांतून कॅनॉलद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. बाकी छोट्या धरणांचे पाणी उन्हाळ्यात नदीपात्रात सोडल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांना जीवदान मिळू शकेल. सध्या नद्यांचे पात्र कोरडे पडल्याने जनावरांचा पाणीप्रश्न बिकट झाल्याने त्यांनाही पाण्याची उपलब्धता होऊ शकेल म्हणून किमान दोन-तीन वेळा नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.