शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव खोऱ्यात पाणीटंचाईचा पंधरवडा

By admin | Updated: May 22, 2017 01:53 IST

नायगाव : नायगावसह नऊ गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी पुन्हा फुटल्यामुळे नायगाव खोऱ्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे नायगावसह नऊ गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी पुन्हा फुटल्यामुळे पंधरा दिवसांपासून नायगाव खोऱ्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने नायगाव खोऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे.सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील गावांना नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना वरदान ठरली आहे. योजनेत सहभागी गावांना या योजनेद्वारे तीन वर्षांपासून दिवसाआड नियमीत पाणी पुरवठा होत होता. भर उन्हाळ्यातही सदर योजना सुरळीत चालत असल्याने नायगाव खोऱ्याची पाण्यासाठीची वणवण थांबली होती. दरम्यान, वर्षभरापासून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या नाशिक-सिन्नर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजनेची चेहडी ते मोहदरी गावापर्यंतची जलवाहिनी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेने टाकण्यात आली होती. सध्या सदर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने जेसीबी, पोकलेन या यंत्रांचा धक्का पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वाढले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जेसीबीचा धक्का लागून शिंदे गावानजीक जलवाहिनी फुटली आहे. पंधरा दिवस उलटूनही जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने सदर योजनेचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे योजनेत सहभागी गावांमध्ये तीव्र पाणी निर्माण झाली आहे. उन्हाळा तीव्रतेच्या ऐन शिखरावर असतांना नायगाव खोऱ्यातील सर्व जलस्त्रोत कोरडेठाक झाले आहेत. अशा परिस्थितीत नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजनेचाच सर्व गावांना आधार आहे. तथापि, योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून होत असलेली पाणी चोरी, दारणा नदीपात्रातील आटलेले पाणी व महामार्ग रुंदीकरणामुळे वारंवार फुटणारी जलवाहिनी यामुळे नायगाव खोऱ्यातील गावांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.