शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोत कोरडेठाक : पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्याची मागणी येवला तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देराजापूर गावाची उन्हाळ्यात पाण्याची तहान भागत नाहीजनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे. राजापूर हे तालुक्यातील मोठे खेडे आहे. या परिसरात ममदापूर संवर्ध राखीवदेखील आहे. परंतु राजापूर गावाची उन्हाळ्यात पाण्याची तहान भागत नाही. गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. परंतु परिसरातील वाड्या वस्तीवरील पाण्याचे काही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा व गावातील टॅँकरच्या खेपा वाढवाव्या. राजापूर येथील अलगट वस्ती, सानप वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी, वाघ वस्ती या मोठ्या वस्ती असूनही या वस्त्यांमध्ये जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शंकर अलगट, सागर अलगट, गोकूळ वाघ, संतोष चव्हाण, बबनराव वाघ, नितीन अलगट, सुभाष अलगट, आनंदा वाघ यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी केली आहे.जलस्रोत कोरडेठाकयेवला तालुक्यातील सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट तीव्र होत चालले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला असून, हंडाभर पाण्यासाठी महिलावर्ग व नागरिकांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. माणसाबरोबरच मुक्या प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालखेड कालवा विभागाने तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे व लाभक्षेत्रातील गावातील सर्व पाझर तलाव पाण्याने भरून द्यावेत अशी मागणी होत आहे. पाणी प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील चाळीस गावांना आज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे व पाणी मागणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. पाणीटंचाईमुळे गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. तालुक्यातील हे नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी पालखेड कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे व पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील गावांमधील पाझर तलाव पाण्याने भरून दिल्यास काही अंशी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. जलसंपदा विभागाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी रतन बोरनारे यांनी केली आहे.