शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:38 IST

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणसमूहात ८३ टक्के इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी महापालिकेला जुलै २०१८ पर्यंत आरक्षित पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याचा उपसा केला जात असून, ३१ जुलैपर्यंत ३००० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक असल्याने यापुढे पाणी उपशाबाबत नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

ठळक मुद्देमहापालिका : प्रतिदिन १५ दलघफू पाणी उपसा३१ जुलैपर्यंत ३००० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक१२९१.६७ दलघफू पाण्याचा उपसा

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणसमूहात ८३ टक्के इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी महापालिकेला जुलै २०१८ पर्यंत आरक्षित पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याचा उपसा केला जात असून, ३१ जुलैपर्यंत ३००० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक असल्याने यापुढे पाणी उपशाबाबत नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.महापालिकेला १५ आॅक्टोबर २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीसाठी गंगापूर धरणातील ३९०० तर दारणा धरणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित केले आहे. प्रतिदिन १४.८२ दलघफू पाणी उपशाप्रमाणे एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. महापालिकेने दि. १५ आॅक्टोबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत गंगापूर धरणातून १२१०.४५ दलघफू तर दारणा धरणातून ८१.२२ दलघफू पाण्याची उचल केलेली आहे. दोन्हीमिळून १२९१.६७ दलघफू पाण्याचा उपसा झालेला आहे. महापालिकेने आतापर्यंत प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याची उचल करत शहराला उन्हाळ्यात वाढणार पाणीवापर सद्यस्थितीत हिवाळ्यामुळे पाण्याची मागणी कमी आहे. तरीही महापालिकेकडून गंगापूर धरणातून १५.२० दलघफू पाण्याची उचल होत आहे. आता फेबु्रवारीपासून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार असून महापालिकेला त्यादृष्टीने नियोजन करणे भाग पडणार असून, नागरिकांचेही प्रबोधन करावे लागणार आहे.