शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

अपर पुनंद प्रकल्पासाठी पाणी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:43 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित अपर पुनंद प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने ८२ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. या निर्णयामुळे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असलेल्या दक्षिण आरम खोऱ्यातील २१ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देबागलाण : २१ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

सटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित अपर पुनंद प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने ८२ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. या निर्णयामुळे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असलेल्या दक्षिण आरम खोऱ्यातील २१ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून बागलाण तालुक्यातील सटाणा शहरासह आरम खोºयाच्या डाव्या बाजूकडील सर्व गावे तसेच सुरुबारी, पिंपळेमाळ, केळझर, भावनगर, करंजखेड, साकोरे, वाड्याचे पाडे, बुंधाटे, डांगसौंदाणे, चाफ्याचा पाडा, दहिंदुले, कंधाणे, तिळवण, नवेगाव, जुने निरपूर, नवे निरपूर, खमताणे, मुंजवाड, दºहाणे,पिंपळदर, मळगाव, मोरेनगर या गावांना पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न भेडसावत होता. अपर पुनंद प्रकल्पामुळे या सर्व गावांचा प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. यासाठी हा प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे होते. गेल्या तीस वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा होत आहे. परंतु प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नव्हती. त्यामुळे उपरोक्त सर्व गावांच्या शेतकºयांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सातत्याने पाठपुरावा केला.गेल्या वर्षभरात या प्रकल्पाचा पूर्ण अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी देखील याबाबत चर्चा होऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. सर्वेक्षणाच्या सूचना जलसंपदा कार्यकारी अभियंता मुसळे, शिंदे, उपमुख्य अभियंता आमले, अव्वल सचिव माहरनर यांनी प्रकल्पासाठी प्रथमत: ८२ दलघफू पाणी आरक्षित करण्याचे ठरविले आणि सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीडॉ. भामरे यांनी सांगितले.