शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आरक्षण; काठोकाठ वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:09 IST

मनपाचे काटेकोर नियोजन : चार हजार दलघफू पाणी उचल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा धरणातील एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षण महापालिकेसाठी दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले होते. महापालिकेने २७५ दिवसांत पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करत आतापर्यंत ४ हजार दलघफू पाण्याची उचल केली असून, प्रतिदिन १४.७३ दलघफू पाणी उचल लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील आरक्षण पूर्ण होणार आहे. भविष्यात पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेला सप्टेंबर २०१७ मध्ये गंगापूर धरणाच्या पाणी आरक्षणासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वाढीव मागणी नोंदवावी लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१५ मध्ये गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला सोडण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यावेळी पाणी आरक्षण निश्चित करण्यावरूनही महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी विरुद्ध शासन असा सामनाही रंगला होता. सन २०१६ मध्ये समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने आवर्तनावरून वादाचा प्रसंग आला नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे गंगापूर आणि दारणा धरण मिळून ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती. मात्र, जलसंपदा विभागाने १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीकरिता गंगापूर धरणातील ३९०० दलघफू तर दारणातील ४०० दलघफू याप्रमाणे एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षित केले. यापूर्वी दारणा धरणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित केले जात होते. परंतु दारणाचा पाणी उपसा करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने दारणातील पाणी आरक्षण घटवत दारणातील पाणी आरक्षणाचा प्रश्नमहापालिकेसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित केले जात असले तरी आजवर केवळ ३०० दलघफूच्या आसपासच पाणी उचल करू शकले आहे. ज्यावेळी चेहेडी बंधाऱ्याला आवर्तन असते त्याचवेळी पाणी उचल करता येते. त्यामुळे दारणातील पाणी आरक्षणाचा फारसा उपयोग मनपाला होत नाही. त्यासाठीच महापालिकेने दारणातील आरक्षण कमी करून ते गंगापूर धरणात वाढवून देण्याची मागणी सातत्याने लावून धरलेली आहे. यंदाही महापालिकेला आरक्षित ४०० दलघफू पाण्यापैकी २७४.३२ दलघफू पाणीच उचलता आले आहे. मनपात आता भाजपा सत्तेवर असल्याने सत्ताधारी दारणाच्या आरक्षणाचा प्रश्न कसा मार्गी लावतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.