शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:20 IST

नांदूरवैद्य : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील अंतर्गत रस्त्यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी दोन नळजोडण्याधारकांवर कारवाईची मागणी केली. ...

ठळक मुद्देनांदूरवैद्य : ग्रामसभेत अंतर्गत रस्त्यांसह विविध विषयांवर चर्चा

नांदूरवैद्य : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील अंतर्गत रस्त्यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी दोन नळजोडण्याधारकांवर कारवाईची मागणी केली. अध्यक्षस्थानी सरपंच उषा रोकडे होत्या. ग्रामविकास अधिकारी किरण शेलावणे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सभेत ग्रामपंचायतीतर्फे सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर गावातील घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांची नावे सभेत वाचून दाखविण्यात आली. पाणीपुरवठा विषयावर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.

माजी सदस्य लक्ष्मण मुसळे, सुधाकर बोराडे यांनी, गावातील दोन नळजोडण्याधारकांवर कारवाई करण्याची मागणी सरपंच रोकडे यांच्याकडे केली. यास ग्रामस्थांनी अनुमोदन दिले. सभेत गावातील सांडपाणी, जुनी गटारव्यवस्था, नांदूरवैद्य ते अस्वली रस्ता, पाणीप्रश्न आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गावामध्ये दारूबंदी यासह इतरअवैध धंदे बंद करण्यासाठी शासनाकडून ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याविषयी ग्रामविकास अधिकारी शेलावणे यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थींच्या खात्यावर निधी जमा न झाल्यामुळे ते लवकरात लवकर वर्ग करावे, अशी मागणी कुंडलिक मुसळे यांनी केली. सभेला अ‍ॅड. चंद्रसेन रोकडे, उपसरपंच पोपटराव दिवटे, ग्रामपंचायत सदस्य नितीन काजळे, केशव डोळस, पंढरीनाथ मुसळे, विकास कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्ष काशीनाथ तांबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते...अन्यथा पाणीपट्टी- घरपट्टी थकबाकीदारांवर कारवाईघरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसीद्वारे समज देण्यात येणार आहे. यानंतरही सदर व्यक्तीने थकबाकी रक्कम भरली नाही तर कारवाई करण्यात येईल, असे ग्रामसभेत ठरले.ग्रामस्थांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी लवकरात लवकर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच उषा रोकडे व ग्रामपंचायत सदस्यांनी केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत