शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

राहुड धरणातून पाणी उपसा

By admin | Updated: February 4, 2016 22:56 IST

चांदवड : बोअरवेल करून बेकायदेशीर कृत्य

चांदवड : चांदवड तालुक्यातील राहुड लघु पाटबंधारे धरणातील बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही रात्री अपरात्री टॅँकरच्या साहाय्याने तसेच प्रत्यक्ष धरण परिसरात बोअरवेल करून बेकायदेशीर पाणी उपसा सुरूच आहे. या तक्रारीनुसार चांदवडचे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्या आदेशानुसार तहसीलदार माणिक अहेर, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, पोलीस कर्मचारी, ग्रामसेवक भारती येशी, ग्रामसेवक योगेश चित्ते, बाळू गांगुर्डे, उपअभियंता ठाकरे, कोतवाल यांच्या उपस्थितीत धरणावर अचानक धाड टाकली असता धरणातील पिण्यासाठी राखून ठेवलेल्या पाण्यापेक्षा कमी साठा उपलब्ध होता. बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांनी प्रत्यक्ष धरणात बोअर घेऊन पाणी उपसा केला आहे. रात्रीच्या वेळी धरणात मोटारी टाकून तसेच टॅँकरने पाणी उपसा करताना आढळून आले. त्याचा पंचनामा करण्यात आला. तर ग्रामपंचायतीने वारंवार ग्रामसभेद्वारे उन्हाळ्यात गावकऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पाणी उपसा बंद करा, असे भावनिक आवाहन करुनही दयेची भावना व कायद्याचा धाक न बाळगणाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पाणी उपसा सुरूच ठेवला आहे. तरी भूजल अधिनियम २०१२च्या तरतुदीनुसार संबंधित पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. (वार्ताहर)