शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या पूर्व भागात पाणीप्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:16 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी, देवपूर, पंचाळे, मिठसागरे, शिंदेवाडी, शहा या गावांमध्ये वस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षापेक्षा यंदाची परिस्थिती भयानक आहे.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी, देवपूर, पंचाळे, मिठसागरे, शिंदेवाडी, शहा या गावांमध्ये वस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.लोकसंख्येच्या प्रमाणात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत असली तरी प्रत्यक्षात मात्र लोकसंख्या आणि टॅँकरमार्फत वाटप होणारे पाणी यांचा ताळमेळ लागत असल्याने अपुºया पाण्यावर जनावरांसह माणसांची तहान भागवावी लागत आहे. पंचाळे येथे दहा हजार लिटर क्षमतेच्या शासकीय टॅँकरच्या पाच फेºया होतात, तर निमा उद्योग संघटनेकडून जनावरांसाठी देवपूर, पंचाळे, मिठसागरे या गावांसाठी प्रत्येकी २२ हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलसेवेचा पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंचाळे गावामध्ये पिण्याची पाण्याची टंचाई नसून ग्रामस्थांना वडांगळीच्या अकरा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पुरेशा प्रमाणात पाणी मिळते. परंतु गावापेक्षा ही वस्ती वाड्यांवर लोकसंख्या जास्त असल्याने पिण्याच्या पाण्याची झळ वस्तीवाड्यांवरील रहिवाशांना बसत आहे. शासनाच्या वतीने वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप एकाही गावात टाक्या बसवण्यात आल्या नाही. रहिवाशांना खर्च करून टाक्या खरेदी करून त्यात पाण्याचा साठा करावा लागत आहे. गावात तीन हजार लोकसंख्या असून, त्याप्रमाणात दोन वाढीव टॅँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव २० हजार पाणी उपलब्ध होऊ शकते. विदारक स्थिती ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व शेतमजुरांसाठी रोजगार हमी योजना उदरनिर्वाहासाठी हक्काची योजना होती. अनेकदा दुष्काळात रोजगार हमीचे जगण्याचे साधन उपलब्ध करून दिले आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाची परिस्थिती भयानक आहे.