शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीच्या अंडरपास खाली साचले ‘पाणीच पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

सिन्नर : समृद्धी महामार्ग ओलांडून जाण्यासाठी महामार्गाखालून बनविण्यात आलेल्या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याचे चित्र आहे. अंडरपासमध्ये ...

सिन्नर : समृद्धी महामार्ग ओलांडून जाण्यासाठी महामार्गाखालून बनविण्यात आलेल्या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याचे चित्र आहे. अंडरपासमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी एमएसआरडीसीकडून अद्यापही कार्यवाही करण्यात न आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची सोय होण्याऐवजी आता पुरती ‘गैरसोय’ होऊ लागली आहे.

सिन्नर तालुक्यातील ६३ ठिकाणी अशा प्रकारे अंडरपास काढण्यात आले आहेत. तेथील जमीन लेव्हल काढून अंडरपास खाली जमा होणारे पाणी बंदिस्त गटांच्या माध्यमातून नैसर्गिक ओढ्या-नाल्यांना काढून देणे गरजेचे असताना गेल्या दोन वर्षांपासून एमएसआरडीसीने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांना मात्र प्रत्येक पावसाळ्यात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. समृद्धी महामार्गाचे काम करताना या परिसरातील गावांच्या नियमित वापराच्या रस्त्यांवर अंडरपासच्या पुलांचे खोदकाम करून बांधकाम करण्यात आले आहे. या प्रत्येक ठिकाणी नियमित रस्त्याच्या समांतर पातळीपेक्षा अडीच ते तीन फूट खोल हे बांधकाम असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पावसाच्या पाण्यामुळे अंडरपासचे रस्ते गाळामुळे निसरडे झाल्याने तेथे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्वरित या अंडरपासखाली ड्रेनेज सिस्टीम कार्यान्वित करावी, अशी मागणी दुशिंगपूरचे सरपंच कानिफनाथ घोटेकर, कहांळवाडीच्या सरपंच वंदना खरात, घोटेवाडीच्या सरपंच मंजुश्री घोटेकर, सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार आदींसह फुलेनगर, निऱ्हाळे, मऱ्हळ, खंबाळे, गोंदे येथील नागरिकांनी केली आहे.

----

गुडघाभर पाणी

सिन्नर तालुक्यात जाणाऱ्या ४६ किमी रस्त्यावरील गटारीचे काम पूर्णत: बाकी असल्याने हा पावसाळा समृद्धी महामार्ग छेदणाऱ्या गावांसाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे किमान तात्पुरत्या स्वरूपात अंडरपास खाली नाल्या तयार करून तेथील पाणी नैसर्गिक उताराकडे काढून देत नागरिकांची अडचण दूर करण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम राबविण्यात येणार असली तरी अद्याप त्याचे काम करण्यात आले नसल्याने सर्वत्र अंडरपासमध्ये पाणी तुंबत आहे. काही ठिकाणी दीड ते दोन फूट उंचीचे पाणी या अंडरपास खाली साठत असल्याने नागरिकांना या पाण्यातून मार्गक्रमण करणे अवघड होऊन बसले आहे. दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या सायलन्सरमध्ये पाणी घुसून त्या मधेच बंद पडत आहेत. पायी चालणाऱ्यांना या मार्गावरून गुडघाभर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे.

---------------------

सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील वावी-सायाळे या प्रमुख रस्त्यावर दुशिंगपूरजवळच्या अंडरपास खाली साचलेले पाणी. (०४ सिन्नर समृद्धी)

===Photopath===

040621\04nsk_14_04062021_13.jpg

===Caption===

०४ सिन्नर समृद्धी