शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गांधी तलावातील पाणी पातळी पु्न्हा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:16 IST

रामकुंडातील पायऱ्यांवर शेवाळ नाशिक : रामकुंडातील पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात शेवाळ पसरल्याने येथे धार्मिक विधीसाठी येणारे भाविक पाय घसरून पडण्याच्या ...

रामकुंडातील पायऱ्यांवर शेवाळ

नाशिक : रामकुंडातील पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात शेवाळ पसरल्याने येथे धार्मिक विधीसाठी येणारे भाविक पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने रामकुंडाची साफसफाई करून शेवाळ काढावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

नाशिक : परपेठेतील बाजारांमध्ये स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढल्याने नाशिक बाजार समितीमध्ये पालेभाज्यांचे दर घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. घाउक बाजारात भाज्यांचे दर घसरले तरी किरकोळ विक्री चढ्या दरानेच होत असल्याने घसरलेल्या दरांचा लाभ कुणाला, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

बंदी असूनही गोदाघाटावर कपडे धुलाई

नाशिक : गोदाघाटावर कपडे धुण्यास बंदी असली तरी अनेक नागरिक सर्रासपणे या परिसरात कपडे धुतात. वारंवार समज देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या ठिकाणी असलेले मनपा कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने गोदावरीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. याठिकाणी कपडे धुणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गंगापूर रोडवर वाहतुकीला अडथळा

नाशिक : गंगापूर रोडवर गेल्या अनेक महिन्यांपासून खोडलेले खड्डे अद्याप बुजविले नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावर उभी करण्यात येणारी वाहने यामुळे वाहतुकीस अडथळ होतोच, शिवाय येथून पायी चालनेही जिकिरीचे झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मार्गदर्शन शिबिरांचा तरुणांना लाभ

नाशिक : शहरातील विविध संस्था संघटनांच्या वतीने तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जात आहे. सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि अनुभवी लोकांकडून या शिबिरांमध्ये मार्गदर्शन केले जात असल्याने त्याचा तरुणांना लाभ होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे काही संस्थांच्या शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

खेड उपसरपंचांचा मजूर फेडरेशनतर्फे सत्कार

नाशिक : नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झालेले खंडेराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन शिवाजी रौंदळ होते. यावेळी राजेंद्र भोसले यांच्यासह संघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. निवडणूक बिनवरोध व्हावी यासाठी जगन्नाथ वाजे यांनी प्रयत्न केले.

महिला आधार केंद्राचे उद‌्घाटन

नाशिक : आपला आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महिला आधार केंद्राचे उद‌्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नीलिमा साठे, अविनाश आहेर, ॲड. रेखा वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होत्या.