शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:22 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भागांतून येणाºया नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब जिल्ह्याधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यासाठी समता परिषदेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भागांतून येणाºया नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब जिल्ह्याधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यासाठी समता परिषदेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.  नाशिक शहरासह जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील हजारो नागरिक रोज वेगवेगळ्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. अनेकदा अधिकाºयांची वेळत भेट न होणे कार्यालयात येणाºया नागरिकांची गर्दी यामुळे नागरिकांना संपूर्ण दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात बसून राहावे लागते. परंतु, उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात होऊनही जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या भागातून येणाºया नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब समता परिषदेच्या तेजस शेरताटे, संतोष लाटे, राकेश महाजन, गणेश डावरे, सौरभ शेरताटे आदींना जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन लक्षात आणून देत जिल्हाधिकारी आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी  केली आहे.पाण्यासाठी मोजावे लागतात पैसेअनेक नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील शीतपेयांच्या स्टॉल्सवर तहान भागविण्यासाठी जावे लागते. अनेकदा येथेही केवळ पाणी मिळत नसल्याने त्यांना अगोदर पैसे खर्चून शीतपेय घेऊन नंतरच तहान भागविण्यासाठी पाणी मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाºया नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने समता परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच पिण्याचे स्वच्छ पाणी उलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय