शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दारणा धरणातील पाणी उपसा बंद

By admin | Updated: June 2, 2016 00:14 IST

अत्यल्प पाणीसाठा : आता सारी भिस्त गंगापूर धरणावर; मे महिना पार झाल्याने सुटकेचा नि:श्वास

 नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा या दोन धरणांपैकी दारणात अवघा ३९ दलघफू पाणीसाठा उरल्याने महापालिकेने पाणी उपसा पूर्णपणे थांबविला असून, आता सारी भिस्त गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. दारणातील उचल थांबल्याने नाशिकरोड भागालाही गंगापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अडचणीचा ठरणारा संपूर्ण मे महिना पार झाल्याने महापालिकेने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. महापालिकेलाही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून, दुर्दैवाने पाऊस लांबल्यास पाणीकपातीचे फेरनियोजन करावे लागणार आहे. महापालिकेसाठी गंगापूर धरण समूह आणि दारणा या दोन्ही धरणांतील पाणी आरक्षित आहे. शासनाने यंदा गंगापूर धरणातील ३००० दलघफू तर दारणातील ५०० दलघफू पाणी महापालिकेसाठी पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षित ठेवले आहे. मात्र, दारणातील केवळ ३०० दलघफू पाणीच तांत्रिकदृष्ट्या उचलणे शक्य असल्याने दोन्ही धरणांमिळून ३३०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. महापालिकेने १५ आॅक्टोबर २०१५ ते २९ मे २०१६ या कालावधीत गंगापूर धरणातून २४५४ दलघफू पाण्याची उचल केली, तर दारणातून १६६ दलघफू पाणीच फक्त उचलता आले. आता गंगापूर धरणातील ५४६ दलघफू, तर दारणातील १३४ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात १२४९ दलघफू (२२.६२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरण तर पूर्णपणे कोरडेठाक पडले असून, गौतमी धरणातही अवघे ४ दलघफू पाणी शिल्लक आहे. ७१४९ दलघफू पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या दारणा धरणात आता केवळ ३९ दलघफू म्हणजे ०.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.