शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

महापालिकेच्या पाण्यात कपात

By admin | Updated: November 23, 2015 23:25 IST

चिंतेचे ढग गडद : नाशिककरांची आठ महिने सत्त्वपरीक्षा

नाशिक : पाणीप्रश्नी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत अखेर नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करण्यात आली असून, ३१ जुलैअखेर महापालिकेसाठी गंगापूर धरणातून २७०० दलघफू, तर दारणातून ३०० दलघफू पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. सुमारे आठ महिने महापालिकेला सदर पाणीसाठा जपून वापरावा लागणार असल्याने यापुढील काळात नाशिककरांवर आणखी पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. दरम्यान, नाशिककरांनी उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले आहे. शहरातील पाणीप्रश्नी मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात जिल्'ातील लोकप्रतिनिधींसमवेत बैठक झाली. यावेळी नाशिक महापालिकेच्या वतीने महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम उपस्थित होते. याप्रसंगी महापौरांनी नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणाबाबत वस्तुस्थिती कथन करत २१ नोव्हेंबर ते ३१ जुलै या २५४ दिवसांच्या कालावधीसाठी ३१३७ दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली. नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वीच शहरात २० टक्के पाणीकपात सुरू केली असल्याचेही महापौरांनी निदर्शनास आणून दिले. सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १२.३५ दलघफू पाणीसाठा उचलला जात आहे. त्यामुळे उर्वरित आठ महिन्यांच्या कालावधीसाठी मागणी केलेल्या आरक्षणात कोणतीही कपात न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सध्या गंगापूर धरणात ३४८५ दलघफू पाणीसाठा शिल्लक असून, मागणी मात्र सर्व मिळून ४९४६ दलघफू इतकी आल्याने पाणीआरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर नाशिक महापालिकेसाठी गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ३०० दलघफू पाणी आरक्षित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पाण्यात कपात करण्यात आल्याने येत्या आठ महिन्यांत पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. याबाबत महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले, महापालिकेच्या पाण्यात कपात झाली असली तरी आहे ते पाणी उर्वरित काळात कसे जपून वापरता येईल यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येईल. नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित असल्याचे महापौरांनी सांगितले. महिनाभराचे पाणी वाचवावे लागणारनाशिक महापालिकेला गंगापूर धरणातून २७०० दलघफू पाणीसाठा उपलब्ध होणार आहे आणि सदर पाणीसाठा २१९ दिवस पुरेल इतकाच आहे. ३१ जुलैपर्यंत २५४ दिवसांसाठी महापालिकेने ३१३७ दलघफू पाणीसाठ्याची मागणी केली होती. परंतु आता २७०० दलघफू पाण्यामुळे महापालिकेला सुमारे ३२ दिवस म्हणजे महिनाभर पुरेल इतक्या पाण्याची बचत करावी लागणार असून म्हणजे सुमारे ३९४ दलघफू इतके पाणी वाचवावे लागणार आहे. अर्थातच त्यासाठी महापालिकेला पाणीकपातीची आणखी काही टक्केवारी वाढवावी लागणार आहे.