येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तिव्रता डिसेंबर मध्येच जाणवू लागली असून तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणी टंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरु वात झाली आहे.विहिरीचे श्रोत आटल्याने व तळ उघडा पडू लागल्याने,टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी तीन गावे आणि एक वाडीचा टँकर मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समीतित दाखल झाला आहे.पाणी टँकर अद्याप तालुक्यात सुरु नसला तरी गावोगावचे पाणीटंचाईचे ठराव यायला सुरूवात झाली आहे.यामुळे आगामी सहा महिन्यात पाणी टंचाई तालुक्याला हैराण करणार असल्याचे चित्र आजच दिसत आहे.पंचायत समिती आणि तहसील संयुक्त पाहणी दौरा मात्र अजून सुरु झालेला नाही.तालुक्यातील अहेरवाडी, खैरगव्हाण, कूसमाडी ही तीन गावे आणिगोपाळवाडीचे (खैरगव्हाण) प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहे.असा होतो पाणीटँकर मागणीचा प्रस्ताव मंजूरपाणीटंचाईच्या गावात प्रथम ग्रामपंचायतीत महिला कमिटी टंचाईचा ठराव करून पंचायत समतिीकडे प्रस्ताव दाखल करतात.गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्त समिती संबंधित पाणीटंचाईच्या गावाला पाहणी करते. त्यानंतर आवश्यकता असल्यास, सदरचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतिम मंजुरीनंतर पाणीटंचाई गावाला पाणी टँकर सुरु होतो.पाणी टंचाई कृती आराखडागेल्या वर्षी सन २०१५-१६ मध्ये येवला तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अंतिम टप्प्यात तब्बल ६३ गावे,४४ वाड्यांना, ३३ टँकरद्वारे दररोज 116 खेपा करण्याची वेळ आली होती.सन 2016-17 मध्ये 482 मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली होती,तरी तालुका पाणी टँकर मुक्त होण्यासाठी नवीन पाणीश्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच कायम राहिली आहे. यंदा दरम्यान पालखेडचे पाणी आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणीमिळाले नसले तरी ,अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची पाणी टंचाई काही काळ लांबणीवर पडली होती.सन २०१७-१८ मध्ये डिसेंबर मध्येच पाणी टंचाई भासू लागल्याने प्रस्ताव दाखल झाले आहेत.
येवला तालुक्यात डिसेंबरमध्येच पाणी टंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 14:29 IST