शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरेचे पाणी देऊनही शहरावर पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 23:58 IST

तिढा कायम : आज निर्णय होण्याची शक्यता

नाशिक : नाशिककरांवर आणखी पाणीकपात न लादता एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित ३०० दलघफू पाणी महापालिकेला देण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जाण्याचे संकेत मिळत असले तरी या वाढीव पाण्यानंतरही शहरावर पाणीकपातीचे संकट कायम राहणार असल्याची गणिते मांडली जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीप्रश्नी कायम असलेला हा तिढा बुधवारी (दि.३) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात वाढीव पाणीकपात करायची की नाही, या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता आणखी पाणीकपातीचा आग्रह सत्ताधारी आघाडीने धरला आहे, तर भाजपाने पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपातीची गरज नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणीकपातीचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शासनाकडून महापालिकेसाठी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित असलेल्या पाण्यातून ३०० दलघफू पाणी देण्याचा निर्णय घेतला जाण्याचे संकेत मिळाले असून, आमदार देवयानी फरांदे यांनीही त्यास दुजोरा दिलेला आहे. मात्र, एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला नाशिककरांची ३१ जुलैपर्यंत तहान भागविण्यासाठी आणखी ३०० दलघफू पाण्याची गरज भासणार असल्याची आकडेवारी सत्ताधारी आघाडीकडून मांडली जात आहे. २७ जानेवारीला विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीनुसार, महापालिका गंगापूर धरणातून प्रतिदिन ११.३५ दलघफू पाणी उचलत असल्याचे सांगण्यात आले. त्यादिवशी गंगापूर धरण समूहात ३०६५ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. महापालिकेसाठी २७०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून, त्यातील १२०० दलघफू पाण्याची उचल झालेली आहे. त्यामुळे मनपासाठी १५०० दलघफू पाणी शिल्लक आहे. महापालिकेला १८६ दिवसांसाठी २१११ दलघफू पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळे शासनाने एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला सुमारे ३०० दलघफू पाण्याची आणखी गरज भासणार आहे. म्हणजेच सुमारे २७ दिवस पाणी पुरणार नसल्याचे स्पष्ट होते. २७ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेला वाढीव पाणीकपात करणे भागच पडणार असल्याची भूमिका सत्ताधारी आघाडीकडून घेतली जात आहे. सदर पाणीकपात ३५ टक्क्यांवर न्यायची की आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवून तूट भरून काढायची, एवढाच काय तो लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत सत्ताधारी आघाडीतील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. (प्रतिनिधी)