शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर रन’ने दिला पाणीबचतीचा संदेश

By admin | Updated: March 20, 2017 01:10 IST

जलसंपदा विभाग : जलयुक्त शिवार योजना फायदेशीर ठरल्याचे सीमा हिरे यांचे प्रतिपादन

नाशिक : जलजागृती सप्ताहांतर्गत जलसंपदा विभागातर्फे रविवारी (दि. १९) आयोजित करण्यात आलेल्या वॉटर रन उपक्रमातून पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते त्र्यंबकरोड येथील सिंचन भवन येथे या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.वॉटर रन उपक्रमातून जलबचतीचा संदेश पोहचविण्याचे आवाहन करताना पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, तो शिवारातच जिरविण्यासाठी शासनाची जलयुक्त शिवार योजना फायदेशीर ठरल्याचेही हिरे यांनी यावेळी सांगितले. मुख्य अभियंता सुभाष वाघमारे यांनी, घरगुती पाणी वापरात काटकसर केल्यास शेती आणि उद्योगाला अधिक पाणी देणे शक्य होईल आणि यामुळे विकासाची गती वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी स्वत:पासून जलबचतीची सुरुवात करायला हवी हे सांगताना पाण्याचे प्रदूषण आणि अतिवापर रोखण्याचे आवाहन केले.जलसंपदा विभागाच्या इंजिनिअर्स जिमखाना येथून सुरुवात झालेल्या वॉटर रनचा एबीबी सर्कल, सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक मार्गे पुन्हा सिंचन भवन येथे या वॉटर रनचा समारोप करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवृत्त सचिव प्रकाश भामरे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, महापालिकेचे शहर अभियंता यू. बी. पवार, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब काथेपुरी, गिरीश संघानी, प्रवीण गायकवाड, नाशिक सायलिस्टच्या मनीषा जगताप आणि रोटरीच्या डॉ. मनीषा खंदळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)