शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पेटले : पार नदीपात्रातच झाली पाणी परिषद

By admin | Updated: January 25, 2015 23:19 IST

दमणगंगा प्रकल्पाविरोधात एल्गा

 केंद्र शासनाच्या दमणगंगा-पिंजाळ, नार-पार प्रकल्पात पेठ तालुक्यात उगम पावणाऱ्या दमणगंगा नदीचा समावेश करण्यात आला असून, नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासींना देशोधडीला लावण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत शिवसेनेसह आदिवासी सेना व नार-पार संघर्ष समितीच्या वतीने जोरदार विरोध करत थेट पार नदीपात्रात पाणी परिषद घेऊन विरोध दर्शविण्यात आला आहे़ यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात आता आदिवासींनी उडी घेतल्याने दमणगंगेचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत़ज्या प्रकल्पावरून दोन महिन्यांपासून राज्यात धुसपुस सुरू आहे, त्या प्रकल्पातील दमणगंगा ही नदी पेठ तालुक्यात उगम पावते आणि अरबी समुद्राला मिळते तसेच सुरगाणा तालुक्यातून वाहणारी नार-पार नदीही पेठ तालुक्यातूनच वाहत जाते़ या नदीवर झरी येथे बंधारा बांधून त्याचे पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सिमेवरील आदिवासींनी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली झरी परिसरातील पार नदीपात्रात पाणी परिषद घेतली़यावेळी महाले यांनी सांगितले की, झरी येथील प्रकल्पाची आखणी करताना शासनाने स्थानिक जनतेला अंधारात ठेवले असून, या प्रकल्पामुळे मूळ आदिवासीच विस्थापित होणार असल्याने शासन याची जबाबदारी घेणार का, असा सवाल केला जात आहे़ महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी अडवून त्यावर गुजरात राज्य सुजलाम् सुफलाम् करण्याचा घाट घातला जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील जनता मात्र दुष्काळात होरपळत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जात आहे़ यामुळे या प्रकल्पाला स्थानिक आदिवासींचा पूर्ण विरोध असल्याने शासनाने बळजबरीने प्रकल्प सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला़ इंकलाब झिंदाबादचा नारा देत नार-पार नदी खोऱ्यात आदिवासींनी पुकारलेला एल्गार प्रकल्पाला कलाटणी देणारा ठरणार असल्याचे दिसून येते़यावेळी माजी आमदार धनराज महाले, पि़ प़ सदस्य तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख भास्कर गावित, आदिवासी सेनेचे केंद्र अध्यक्ष डॉ़ पंकजकुमार पटेल, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, नार-पार संघर्ष समितीचे रणजित देशमुख, रामदास वाघेरे, विलास अलबाड, मोहन कामडी, हिरामण गावित यांच्यासह पेठ, दिंडोरी व सुरगाणा तसेच गुजरात सिमेवरील आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (वार्ताहर)