शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

पाणी अडवा पाणी जिरवा : लायन्स क्लब आॅफ प्राइडचा हेतू साध्य

By admin | Updated: October 31, 2014 22:17 IST

पांझण नदीपात्रातील बंधाऱ्यात पाणी

मनमाड : येथील लायन्स क्लब आॅफ मनमाड प्राइड या संस्थेच्या पुढाकाराने पल्लवी मंगल कार्यालयासमोरील पांझण नदीपात्रात बांधलेल्या सिमेंट प्लग बंधाऱ्यात पाणी जमा होऊन बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने क्लबचा ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा हेतू साध्य झाला आहे. या पाण्यामुळे परिसरातील विंधनविहिरींची पाण्याची पातळीवर आली असून, पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात झाली आहे.मनमाड येथे लायन्स क्लब आॅफ मनमाड प्राइडचे अध्यक्ष हेमराज दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या अभियांनातर्गत सुमारे १३ लाख रुपये खर्चाच्या आरसीसी बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या बंधाऱ्यामुळे या ठिकाणच्या वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवण्यात आल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईमध्ये होरपळणाऱ्या मनमाड शहरात या उपक्रमामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मनमाड प्राइडचे पदाधिकारी हेमराज दुगड, दिशेन मुनोत, दिनेश आव्हाड, दत्तात्रय सूर्यवंशी, संदेश बेदमुथा, नाविद शेख, शैलश बेदमुथा, नईम शेख, संजय मुथा, दीपक पारीक, मुकेश गांधी, प्रवीण अव्हाड, सुमतीलाल बरडिया, मंगेश सगळे अनिल दराडे, दीपक मकवाणे, निर्मल भंडारी यांच्यासह अन्य लायन्स सदस्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.पांझण व रामगुळणा नदीपात्रात गेल्या ५० -६० वर्षापासून साचलेला शेकडो टन गाळ लोकसहभागातून मनमाड बचाव कृती समितीच्या पुढाकाराने काढण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या बांधकामानंतर आता या भागात जॉगिंग ट्रॅकसह गार्डन ,पिकनिक स्पॉट उभारण्याचा समितीचा प्रयत्न सुरू आहे. (वार्ताहर)