शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

हजारो लिटर पाणी वाया : महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 23, 2016 01:05 IST

पाथर्डी फाटा येथे व्हॉल्व्हमधून पाणीगळती

पाथर्डी फाटा : पाथर्डी फाटा चौकातील पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांवरील मोठमोठ्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होऊन पाणी वाया जात असून, पाण्याचे पाट वाहताना पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवूनदेखील पाणीगळती थांबवली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. व्हॉल्व्हचे चेंबर उघडे ठेवल्यानेच व्हॉल्व्ह नादुरुस्त करून पाणीगळती घडवून आणली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाथर्डी फाटा येथील जलकुंभामधून सिडको, इंदिरानगर, वासननगर, प्रशांतनगर व अन्य मोठ्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. परिणामी पाथर्डी फाटा चौकात जलवाहिन्यांवरचा व्हॉल्व्ह झोन तयार झाला आहे. सर्व दिशांना जलवाहिन्यांवर मोठमोठे व्हॉल्व्ह आणि त्यांचे चेंबर्स आहेत. पाणीपुरवठा हा महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असूनदेखील पाथर्डी फाट्यावरील बहुसंख्य व्हॉल्व्हचे चेंबर्स मात्र उघडे ठेवून देण्यात आले आहेत. या उघड्या चेंबर्समधील व्हॉल्व्हशी कधी-कधी परिसरातील व्यावसायिक छेडछाड करून गळती निर्माण करतात, तर कधी संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे व्हॉल्व्ह नादुरु स्त होतात. पाणी सोडायच्या वेळेत नादुरु स्त व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होऊन ते रस्त्याने वाहू लागते. गेल्या चार-पाच दिवसांपासून रात्री आठ ते नऊच्या दरम्यान उड्डाणपुलाखालच्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असून सर्व्हिस रस्त्यावर या वेळेत पाण्याचा पाट वाहत असतो. याविषयी मनपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना विचारले असता, नागरिकांनीही कळवल्याचे सांगून कर्मचाऱ्यांना दुरु स्तीसाठी पाठवल्याचे सांगितले, मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पाण्याची गळती सुरूच राहिली. या भागातील अनेक व्हॉल्व्हच्या चेंबर्सना झाकण किंवा जाळ्या नसल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात असल्याने व्हॉल्व्ह वारंवार नादुरुस्त होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. व्हॉल्व्ह दुरुस्त करून संरक्षित करण्याची मागणी बी. व्ही. गायकवाड, राहुल निकुंभ, तुषार गायकवाड, विजय सोनवणे, मेघश्याम नवले आदिंनी केली आहे. (वार्ताहर)