शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागांना प्रत्येकी ४५ सफाई कर्मचारी उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:43 IST

समान वाटप : आठवडाभरात होणार अंमलबजावणी नाशिक : महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्या सोयीच्या नियुक्त्या आणि प्रभागांमध्ये सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप याबाबत सभागृहात सदस्यांकडून वारंवार होणारी ओरड लक्षात घेता महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने सफाई कर्मचाºयांचे समान वाटपाचे सूत्र तयार केले असून, ३१ प्रभागांना प्रत्येकी ४५ सफाई कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. आठवडाभरात त्याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नाशिक : महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्या सोयीच्या नियुक्त्या आणि प्रभागांमध्ये सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप याबाबत सभागृहात सदस्यांकडून वारंवार होणारी ओरड लक्षात घेता महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने सफाई कर्मचाºयांचे समान वाटपाचे सूत्र तयार केले असून, ३१ प्रभागांना प्रत्येकी ४५ सफाई कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. आठवडाभरात त्याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मागील महिन्यात झालेल्या महासभेत हेमलता कांडेकर यांनी शहरातील सफाई कर्मचाºयांसंबंधी माहिती विचारलेली होती. त्यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत सफाई कर्मचाºयांच्या असमतोल नियोजनाचे वास्तव समोर आले होते. महापालिकेत सफाई कर्मचाºयांची संख्या १९९३ असली तरी त्यातील २६२ कर्मचारी हे प्रशासनाच्या कामाच्या सोयीने प्रत्यक्ष रस्त्यावर काम न करता विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वाधिक १८८ कर्मचारी कार्यरत आहेत तर सर्वांत कमी अवघे सहा कर्मचारी प्रभाग २८ मध्ये कार्यरत आहेत. जुन्या नाशिकमधीलच प्रभाग क्रमांक १४ मध्ये १४३ कर्मचारी नियुक्त आहेत. दोन्ही प्रभागांत दाट लोकवस्ती असली तरी कर्मचाºयांची संख्या ३३१ इतकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संख्या असली तरी जुने नाशिक परिसरात स्वच्छतेबाबतची ओरड काही थांबलेली नाही. अनेक प्रभागांमध्ये २० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय, अनेक कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर नसल्याचे अधिकाºयांनी दिलेल्या भेटीत निदर्शनास आले होते. त्यामुळे नवीन प्रभाग झाल्याने सफाई कर्मचाºयांचे प्रभागनिहाय समान वाटप करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. महापौरांनीही त्याबाबतचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार, प्रत्येक प्रभागाला ४५ सफाई कामगार उपलब्ध होणार असून, अन्य विभागात कामाच्या सोईने नियुक्त झालेल्या २६२ कर्मचाºयांच्या हाती झाडू सोपविण्यात येणार आहे.दिवाळीत रात्रीची सफाई सुरू रात्रीची सफाई बंद करण्याचा ठराव महासभेने मंजूर केला असला तरी दिवाळी सणामुळे तूर्त रात्रीची सफाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे महापौर रंजना भानसी व सभागृहनेता दिनकर पाटील यांनी सांगितले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला स्वच्छता ठेवण्यासंबंधी उपाययोजना करण्याचेही आदेशित करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.