शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेशन पुरवठ्यासाठी नाशकात ‘वॉर रूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:42 IST

कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येला रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा खात्याने नाशकात ‘ वॉर रूम’ उघडली असून, आपल्या सहकाऱ्यांसह राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यात ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत.

ठळक मुद्देभुजबळ यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ : केशरी पत्रिकाधारकांनाही मिळणार लाभ

नाशिक : कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येला रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा खात्याने नाशकात ‘ वॉर रूम’ उघडली असून, आपल्या सहकाऱ्यांसह राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यात ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत.लॉकडाउनच्या काळात राज्याच्या एकूण लोकसंख्येतील निम्म्या लोकसंख्येच्या पोटाची भूक शमविण्याचे मोठे आव्हान पुरवठा विभागावर आहे. राज्यातील १२ कोटी लोकसंख्येपैकी रेशनवरील धान्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ७ कोटी इतकी असून, इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या उदर भरणाची जबाबदारी सरकारवर येऊन पडली आहे. त्यासाठी भुजबळ यांनी नाशकातील आपल्या निवास्थानातूनच ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले आहे.यासाठीचा वॉररूम चोवीस तास कार्यान्वित असून, प्रतिदिनी किमान हजार ते बाराशे तक्रारी यावर प्राप्त होत आहेत. लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या सुमारे पाच लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था राज्यात ४ हजार ५२३ ठिकाणी करण्यात आली आहे.स्थलांतरितांसाठी विशेष योजनेची मागणीस्थलांतरित अथवा ज्यांचे कोणतेही कार्ड नाही अशा राज्यातील सुमारे २ कोटी नागरिकांसाठी केंद्र सरकारने विशेष योजना द्यावी, अशी मागणी भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे सोमवारी (दि.१३) झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली आहे.मे-जून महिन्यात होणार धान्याचे वाटपलॉकडाउनची परिस्थिती पाहता केशरी शिधापत्रिका धारकांनाही रेशनचे धान्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, राज्यातील ३ कोटी ८ लाख पत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. मे आणि जून महिन्यात या धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.रोज मजुरी करून गुजराण करणाºया सामान्यातील सामान्य व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्यात मुबलकधान्याचा साठा उपलब्ध आहे. त्याची चिंता करू नये. शिधापत्रिका नसलेल्या गरीब, गरजूंनाही धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात या कामी महाराष्ट्र अव्वल आहे.- छगन भुजबळ,अन्न व नागरी पुरवठामंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न