शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वणी परिसरात कारले ३५ रुपये किलो !

By admin | Updated: June 27, 2017 01:34 IST

वणी : कृषी उत्पादित वस्तूंना समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्गाकडून ठेवण्यात येते; मात्र विविध अडचणी उभ्या ठाकतात व नैराश्याचे वातावरण निर्माण होते;

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कृषी उत्पादित वस्तूंना समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्गाकडून ठेवण्यात येते; मात्र विविध अडचणी उभ्या ठाकतात व नैराश्याचे वातावरण निर्माण होते; मात्र सध्या कारले या पिकाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला असून, सुमारे ३० ते ३५ रु पये प्रतिकिलोचा दर उत्पादकांना मिळत असल्याने उत्पादकांत उत्साहाचे वातावरण असून, कडू कारल्याच्या गोड कहाणीमुळे उत्पादक खुशीत आहेत.  वणी-कळवण रस्त्यावरील शेतजमिनीत साधारणत: एप्रिल महिन्यात कारल्याची लागवड काही उत्पादकांनी द्राक्षबागेत करून आंतरपीक उत्पादनाचे नियोजन केले होते. सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेण्यास अग्रक्रम दिला. रोपवाटिकेतून कारल्याचे रोप आणून ६३९ अशा अंतरात लागवड केली. ७५० रोप लागवड एक एकर क्षेत्रात करण्यात आली. चार ट्रॅक्टर शेणखत रोगप्रतिबंधक फवारणी व तत्सम बाबींच्या समावेशपासून लागवड ते उत्पादन अशा द्राविडी प्राणायामासाठी एकरी ३० हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती उत्पादक गणेश देशमुख यांनी दिली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या १५ किलो क्रेटला दर्जा व प्रतवारी पाहून ५०० रुपये दर मिळत आहे. एकदा उत्पादन सुरू झाल्यानंतर चार महिन्यापर्यंत उत्पादन घेण्यात येते तसेच दोन दिवसाआड खुडणी करण्यात येते. दरम्यान कारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांच्या कष्टाचे चीज केल्याने उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शेती उत्पादने घेण्यास सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने कडू कारल्याची गोड चव चाखता आली, अशी माहिती उत्पादक रवींद्र पवार व कचरू पवार यांनी दिली.