मनोज देवरे कळवणपुनंद प्रकल्प व्हावा, कसमादेचा पाणीप्रश्न सुटावा, पाण्याची साठवण व्हावी यासाठी शासनाला ज्यांनी जमिनी दिल्या, त्याच आदिवासी बांधवांच्या व जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. धरण उशाला राहून पाणी मिळणे दुरापास्त झाले असून, पाण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आदिवासीजनतेवर आली आहे.या गावांना पाणी आरक्षित करण्यात शासकीय यंत्रणा नाखूश असल्याने पाण्यासाठी आता आम्ही जायचे कुठे, असा सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे. पुनंदच्या पाण्यावर जनतेचा अधिकार शासनाने लादल्याने पाणी असूनदेखील पाणी मिळविण्यासाठी शासन यंत्रणेच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आदिवासी जनतेवर आली आहे.
पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 22:51 IST