शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांची दहशत

By admin | Updated: June 20, 2017 00:47 IST

नागरिकांमध्ये घबराट : येवल्यात अनेकांना चावा

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहरामध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून, सोमवारी कुत्र्यांच्या हल्लयात अनेकजण जखमी झाले असून जखमींवर सरकारीसह खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कुत्र्यांच्या दहशतीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, जखमींनी येवला ग्रामीण रुग्णालयात तसेच खासगी दवाखान्यात जाऊन रेबीज लस घेतली. परंतु याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्र ारी करूनही याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.येवला शहरात गेल्या पाच दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, ठिकठिकाणी या कुत्र्याने चावा घेऊन अनेकांना जखमी केले आहे. अचानक चावा घेणारे हे दोन कुत्रे पिसाळलेले असल्याची माहिती आहे. काळ्या व पांढऱ्या रंगाचे हे दोन पिसाळलेले कुत्रे रस्त्यावर व शहर परिसरात भटकत आहेत व जोरदार चावा घेत असल्याचे बघ्यांनी सांगितले.शहरातील बुंदेलपुरा, कहार गल्ली भागामध्ये गेल्या चार-पाच दिवसांमध्ये तानिया शेख (११), इसान सय्यद अली (३), मोमीन महंमद शिफक (५५), मोमीन अन्सारी (५१), अमन अन्सारी (३), हयान शेख (९), इसान सादिक सय्यद (५), सोहम सोनवणे (७) यांच्यासह अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. शहरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून, भटक्या कुत्र्यांची संख्याही लक्षणीय आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढूनही प्रशासन ढिम्मच आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ करण्याची मागणी होत आहे. येवला शहरासह अंदरसूल रोड, नांदगाव रोड व बसस्थानक परिसरासह विविध भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.