शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

लोकवस्तीतून जेरबंद बिबट्यां करण्यासाठी वेशीवर ‘तटबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:40 IST

जिल्ह्यासह शहराच्या आजूबाजूलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून, तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे.

नाशिक : जिल्ह्यासह शहराच्या आजूबाजूलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून, तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे. शहराच्या वेशीवरून वाहणाऱ्या डाव्या कालव्यालगतच्या मळे परिसरापासून तर थेट देवळाली कॅम्प-भगूर परिसरांपर्यंत बिबट्याचा संचार आढळून येत आहे. त्यामुळे लोकवस्तीतून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शहराच्या वेशीवर वनविभागाकडून पिंजरे लावून जणू ‘तटबंदी’ केली आहे.दि. २५ जानेवारी व दि. १७ फेब्रुवारी रोजी शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या सावरकरनगर या सीमेंटच्या जंगलात दोन प्रौढ नर बिबट्यांनी शिरकाव केला होता. या दोन्ही घटनांमध्ये अनुक्रमे दोन व एक असे तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. या बिबट्यांना जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. तसेच शनिवारी (दि.२३) भगूर गावालगत रेणुकादेवी मंदिराजवळ लोकवस्तीत लावलेल्या पिंजºयात एक वर्षाचा बछडा पिंजºयात जेरबंद करण्यात आला. अद्यापही शहराच्या वेशीवर बिबट्यांचा संचार वनविभागाला आढळून येत आहे. पिंजरे लावायचे तर कोठे-कोठे? अन् किती?, असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.शहरालगत बिबट्याचा वाढता संचार हा धोक्याचा जरी मानला जात असला तरी बिबट्या शहराच्या वेशीवर किंवा लोकवस्तीत का शिरकाव करीत आहेत? या प्रश्नाचे उत्तर नागरिकांनी शोधणे गरजेचे आहे.नैसर्गिक अधिवासात माणसाकडून होणारे अतिक्रमणामुळे बिबट्याचे लोकवस्तीत अतिक्रमण होऊ लागले आहे. नैसर्गिक अधिवासामधील जगण्याचे संसाधनेही कमी झाल्याने बिबट्याने परिघ ओलांडल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग