शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वाकदला कालिका माता यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 21:44 IST

देवगाव : वाकद येथील कालिका माता मंदिर परिसरात दोन दिवशीय यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ग्रामस्थांच्या वतीने नुकताच मंदिराचा जिर्णोद्दार

देवगाव : वाकद येथील कालिका माता मंदिर परिसरात दोन दिवशीय यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र तुळजापूर येथून ज्योत आणण्यात येणार आहे. तसेच रविवारी (दि.२८) सकाळी देवीच्या अलंकाराची व चासनळी ता. कोपरगाव येथून आणलेल्या कावडीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. अ‍ॅड. उत्तम वाळुंज व वंदना वाळुंज यांच्या हस्ते देवीची महापूजा केली जाणार आहे. मंगळवारी (दि.२९) कुस्त्यांची विराट दंगल आयोजीत करण्यात येणार आहे.नवरात्रोस्तवानिमित्तही येथे मोठी यात्रा भरते. महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी व्यवस्थापन समितीमार्फत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिरामध्ये सकाळ, सायंकाळ देवीची आरती केली जाते.यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण बडवर, उपाध्यक्ष दिगंबर गायकवाड, रामेश्वर वाघचौरे, राहुल बडवर, रमेश पवार, गणेश गायकवाड, भाऊसाहेब बडवर, दत्तात्रय वाळुंज, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र बडवर, माणिक बडवर, प्रकाश कदम, विठ्ठल गाडेकर, विष्णुपंत बडवर, विश्वनाथ गायकवाड, दारकू बडवर, रामराव बडवर, बाजीराव बडवर, बंडेराव गायकवाड, सोमनाथ गोसावी, अंबादास खैरे, वसंत गायकवाड, बाळासाहेब शिंदे आदी प्रयत्नशील आहेत.चौकट...कालिका माता मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते की, सन १९३२ मध्ये गोई नदीला महापूर आल्याने वाकद हे गाव महापुरात पूर्णपणे वाहून गेले मात्र कालिका मातेचे मंदिर व मूर्ती मात्र शाबूत राहिल्याचे सांगण्यात येते.सध्याचे वाकद हे पुनर्वसित गाव आहे, परंतु कालिका माता मंदिर हे आजही त्याच ठिकाणी म्हणजे गोईतीरी मोठ्या दिमाखात उभे आहे. मंदिर कळसाचा गोलघुमट व एकूणच बांधकाम मोगल शैलीतील आहे, त्यामुळे हे मंदिर अत्यंत पुरातन व मुगलकालीन असावे असे वाटते. ग्रामस्थांच्या वतीने नुकताच मंदिराचा जिर्णोद्दार, नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली आहे. मंदिर परिसरात भव्य मंगल कार्यालय बांधण्यात आले आहे.